पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सोमवारी (२५ एप्रिल) आयपीएल २०२२चा ३८वा सामना झाला. हा सामना पंजाबने ११ धावांनी जिंकला. पंजाबच्या विजयाचा नायक ठरला, सलामीवीर शिखर धवन. त्याने चेन्नईविरुद्ध नाबाद ८८ धावा फटकावल्या. आता आपल्या शानदार खेळीबद्दल धवनने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला पूर्वीपासूनच चेन्नईच्या गोलंदाजांची योजना माहित असल्याचे त्याने सांगितले आहे.
आपल्याला चेन्नईच्या वाइड यॉर्कर (Bowl Wide Yorkers) गोलंदाजी करण्याच्या योजनेबाबत माहिती होते. तसेच आपल्या खेळीदरम्यान आपण मैदानाच्या छोट्या बाजूला आक्रमण करण्याचा विचार डोक्यात होता, असे सांगितले आहे.
अर्शदीप सिंगसोबत पोस्ट मॅच डिस्कशनमध्ये बोलताना धवन (Shikhar Dhawan On CSK Bowlers Plan) म्हणाला की, “माझ्या खेळीदरम्यान माझ्या डोक्यात एकच गोष्ट चालू होती की, मैदानाच्या छोट्या बाजूला आक्रमण करायचे. परंतु मी कोणत्या एकाच गोलंदाजाच्या मागे लागणार नव्हतो. मी चेन्नईविरुद्ध बऱ्याचदा खेळलो आहे. त्यामुळे मला त्यांच्या योजनांबद्दल माहिती होती की, ते माझ्याविरुद्ध वाइड यॉर्कर फेकतील. मग मी त्यांच्या वाइड यॉर्कर्सला मैदानातील लांबच्या भागात आणि सोबतच ऑन साइडवरही मारले.”
धवननेही हेही स्विकार केले की, तो सुरुवातीला श्रीलंकन गोलंदाज माहिश तिक्षिणाविरुद्ध सतर्कतेने खेळू इच्छित होतो. परंतु योग्य वेळ आल्यानंतर धवनने त्याच्या गोलंदाजीवरही फटकेबाजी केली. याबद्दल बोलताना धवन म्हणाला की, “मला वानखेडेमध्ये खेळायला आवडते. तेथील खेळपट्टी चांगली होती. सुरुवातीला मला फटकेबाजी करायला जरा अवघड गेले. पण मी धैर्य बनवून ठेवले. एकदा मी मैदानावर सेट झाल्यानंतर १-२ असे काही षटक आले, ज्यावर मी भरपूर धावा बनवल्या.”
दरम्यान चेन्नईविरुद्धचा सामना हा धवनचा आयपीएल कारकिर्दीतील २००वा सामना होता. या खास सामन्यात त्याने पंजाबकडून ५९ चेंडू खेळताना २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ८८ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे पंजाबने १८७ धावा फलकावर लावल्या. यामध्ये भानुका राजपक्षेच्या ४२ धावांच्या खेळीचाही समावेश होता. पंजाबच्या या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून अंबाती रायुडूने ७८ धावांचे योगदान दिले. परंतु त्याला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याचे चेन्नईचा संघ १७६ धावांवरच गारद झाला आणि पंजाबने ११ धावांनी हा सामना जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जेव्हा युवराजला पाहून चहलची टरकलेली; म्हणाला, ‘वाटलं होतं ६ षटकार मारेल’
समालोचन सोडून इंग्लंडचे प्रशिक्षक बनणार का रवी शास्त्री? म्हणाले, ‘आता हा रस्ता ओलांडून…’
इंग्लंडचं ठरलं! मिळाला नवीन कसोटी कर्णधार; भारतीय संघाला विश्वविजेता बनवणारा दिग्गज बनणार कोच