सोमवारी (२५ एप्रिल) पंजाब किंग्जने चार वेळची आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला ११ धावांनी मात दिली. पंजाबला मिळालेल्या विजयात अनुभवी शिखर धवनचे योगदान सर्वात मोठे ठरले. धवनने केलेल्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर तो सामनावीर देखील ठरला. या धावांदरम्यान त्याच्या बॅटमधून एक असा शॉट निघाला, जो पाहून प्रत्येक चाहत्याचे मन सुखावले.
पंजाब किंग्जने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. डावाच्या १७ व्या षटकात मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) गोलंदाजीसाठी आला होता. मुकेशच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धवनने एक स्कूप शॉट खेळला, जो थेट सीमारेषेपार चौकार गेला. शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार पाहून तो किती सहजतेने फलंदाजी करत होता, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. या स्कूप शॉटनंतर सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील हैराण झाल्याचे पाहायला मिळाले.
https://twitter.com/IPL/status/1518616964079386624?s=20&t=dEh7cmiQ0rrBd_fzd7plsQ
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सामन्याचा विचार केला, तर सीएसकेले नाणेफेक जिंकून प्रतम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने ४ विकेट्सच्या नुकसानावर १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेला हे लक्ष्य गाठता आले नाही. सीएसकेने मर्यादित २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १७६ धावा केल्या आणि ११ धावांनी पराभव स्वीकारला. गोलंदाजांमध्ये पंजाब किंग्जसाठी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि ऋषी धवन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स नावावर केल्या. सीएसकेच्या ड्वेन ब्रावोने देखील स्वतःच्या नावापुढे दोन विकेट्स नोंदवल्या.
धवनने ५९ चेंडू खेळले आणि यामध्ये ९ चौकारांसह २ षटकार ठोकत ८८ धावा साकारल्या. तिसऱ्या क्रमांकावरील भानुका राजपक्षाने (३२ चेंडूत ४२ धावा) त्याला चांगली साध दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी देखील पार पाडली. यादरम्यान धवन असा पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला, ज्याने सीएसकेविरुद्ध वैयक्तिक १००० धावा पूर्ण केल्या. तसेच, तो विराट कोहलीनंतर आयपीएलमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारा दुसरा फलंदाजही बनला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खरंच भाऊ-भाऊ आहेत का ऋषी अन् शिखर धवन? वाचा काय आहे नेमकं त्यांचं नातं
चेन्नईसाठी ६ व्या पराभवानंतरही उघडे आहेत आयपीएल २०२२ प्लेऑफचे दरवाजे, जाणून घ्या समीकरण
‘त्याचीच कमी भासतेय’, चेन्नईच्या ६ व्या पराभवानंतर कर्णधार जडेजाने सांगितली संघातील कमजोरी





