शिखर धवन भारताचा दिग्गज फलंदाज असला, तरी आगामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकात त्याच्या नावावर विचार केला जात नाहीये. धवन या दोन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये खेळणार नसला, तरी त्या आपल्या संघातील दोन खेळाडूंकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा वर्तवली आहे. धवनने एकून 5 खेळाडूंची नावे सांगितली, जे आगामी वनडे विश्वचषकात सर्वात्तम प्रदर्शन करू शकतात.
यावर्षीचा वनडे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात खेळला जाणार आहे. शिखर धवन () याला वनडे विश्वचषक संघात स्थान मिळणार नाही, याबाबत कुठली अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र, हे जवळपास निश्चत मानले जात आहे. असे असले तरी, धवन संघ विश्वचषकात संधी मिळणार नसल्यामुळे नाराज दिसत नाही. त्याने आगामी विश्वचषकासाठी निवडलेल्या आपल्या संघात सर्वत्तमत 5 खेळाडूंची नावेही सांगितली. यातील दोन खेळाडू भारतीय संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. या दोघांनंतर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, अफगाणिस्तानचा राशिद खान आणि दक्षिण आफ्रिका संघाचा कागिसो रबाडा यांची निवड धवनने केली.
विराट कोहलीने भारतासाठी तीन वनडे विश्वचषक खेळले असून त्याची निवड धवनने सर्वात आधी केली. धवन म्हणाला, “नक्कीच पहिली निवड विराट कोहलीची करेल. तो जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे आणि वेड्यासारखा धावा करतो.” दरम्यान, धोनीच्या नेतृत्वात 2011 साली जिंकलेल्या विश्वचषकावेळीही विराट भारतीय संघाचा भाग होता. धवनने आपल्या 11 सदस्यीय संघात दुसरे नाव रोहित शर्मा याचे घेतले. “हिटमॅन खूप अनुभवी खेळाडू आहे. आयसीसी स्पर्धा आणि त्याचसोबत द्विपक्षीय मालिकांमध्ये त्याने खूप धावा केल्या आहेत.”
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने 2019 वनडे विश्वचषकात 27 विकेट्स घेतल्या होत्या. धवनच्या मते यावर्षीही स्टार्क चेंडून कहर करू शकतो. याचा पार्श्वभूमीवर त्याने तिसऱ्या क्रमांकावर त्याची निवड केली. धवनने यावेळी स्टार्क जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सांगितले. धनवच्या मते राशिद खान देखील भारतीय खेळपट्टीवर खूप जास्त प्रभावशाली ठरू शकतो. तसेच शाहीन आफ्रिदीच्याही आधी त्याने कागिसो रबाडाला सर्वोत्तम पाच खेळाडूंमध्ये निवडले.
महत्वाच्या बातम्या –
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत एकुण 160 खेळाडू सहभागी
बुमराहच्या नावावर मोठा विक्रम, खास यादीत तिसरा क्रमांक मिळवण्यासाठी हार्दिक पंड्याला टाकले मागे