क्रिकेटटॉप बातम्या

बुमराहच्या नावावर मोठा विक्रम, खास यादीत तिसरा क्रमांक मिळवण्यासाठी हार्दिक पंड्याला टाकले मागे

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 33 धावांनी विजय मिळवला. रविवारी (20 ऑगस्ट) डबलिनमध्ये पार पडलेल्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने ही टी-20 मालिका देखील नावावर केली. जसप्रीत बुमराह याने या मालिकेतून जबरदस्त पुनरागमन केले. त्याने मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या असून हार्दिक पंड्या याचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

आयर्लंड आणि भारत (IRE vs IND) यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकात भारताने 5 बाद 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंड संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 152 धावांपर्यंत मजल मारू शकला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येक दोन-दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात घेतलेल्या दोन विकेट्सच्या जोरावर बुमराह भारतासाठी सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. बुमराहने हार्दिक पंड्या (hardik Pandya) याला मागे टाकत यादीत तिसरा क्रमांक पटकावला.

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. चहलने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 80 सामने खेळून भारतासाठी सर्वाधिक 96 विकेट्स घेतल्या आहेत. 90 विकेट्सस भुवनेश्वर कुमार या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यासाठी भुवनेश्वनला 87 विकेट्स घ्याव्या लागल्या होत्या. जसप्रीत बुमराहने तिसऱ्या क्रमांकावर स्थान बनवले असून त्याने 62 सामन्यांमध्ये 74 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पंड्या याने आतापर्यंत 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यात 73 विकेट्स घेऊ शकला आहे.

भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम विकेट्स घेणारे गोलंदाज
96 – युझवेंद्र चहल (80 सामने)
90 – भुवनेश्वर कुमार (87 सामने)
74 – जसप्रीत बुमराह (62 सामने)
73 – हार्दिक पंड्या (92 सामने)

दरम्यान, आयर्लंड आणि भारत यांच्यातील या दुसऱ्या टी-20 सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी ऋतुराज गायकवाड आणि आयर्लंडसाठी अँडी बालबिर्नी यांनी प्रत्येकी सर्वाधिक धावांची खेळी केली. ऋतुराजने 58, तर बालबिर्नीने 72 धावा कुटल्या. असे असले तरी, बालबिर्नीला संघातील इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. परिणामी आयर्लंडला सामना गमवावा लागला.

महत्वाच्या बातम्या –
IREvsIND । बुमराहच्या नेतृत्वात गोलंदाजांचे कहर प्रदर्शन! अर्शदीपच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद
बी-लव्ह कॅंडीने उंचावली लंका प्रीमियर लीगची ट्रॉफी! मॅथ्यूजची कॅप्टन्स इनिंग 

Related Articles