भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी (20 ऑगस्ट) पार पडला. भारताने या सामन्यात 33 धावांनी विजय मिळवला आणि मालिका देखील नावावर केली. भारतीय संघाच्या विजयात ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. सामना संपल्यानंतर ऋतुराज माध्यमांशी बोलताना या सामन्यातील आपल्या खेळीसाठी एमएस धोनी याला श्रेय देताना दिसला.
एमएस धोनी (MS Dhoni) आणि ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळतात. एमएस धोनी भारतीय संघाला लावळेला आतापर्यंतचा सर्वात्तम कर्णधार आहे. अशात धोनीच्या मार्गदर्शनात आयपीएल खेळताना ऋतुराजला देखील अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 19* धावा करणाऱ्या ऋतुराजने दुसऱ्या सामन्यात 43 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. त्याची ही खेळी संघाच्या विजयात नक्कीत महत्वाची ठरली.
सामना संपल्यानंतर ऋतुराजने एमएस धोनीला याचे श्रेय दिले. माध्यमांसमोर तो म्हणाला, “खरं सांगचायं झालं तर नेतृत्व करणे कठीण गोष्ट आहे. एमएस धोनी नेहमी म्हणायचा की, एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष द्या. भविष्याची चिंता करू नका. मी सोशल मीडिया देखील पाहणे टाळतो आणि माझ्याबद्दल कोण काय बोलते, हे देखील पाहत नाही. सीएसकेमध्ये मी शिकलेल्या काही गोष्टींपैकी हा एक महत्वाचा गुण आहे.”
(Rituraj Gaikwad credited MS Dhoni after his second half-century in T20 international career)
महत्वाच्या बातम्या –
बुमराहच्या नावावर मोठा विक्रम, खास यादीत तिसरा क्रमांक मिळवण्यासाठी हार्दिक पंड्याला टाकले मागे
IREvsIND । बुमराहच्या नेतृत्वात गोलंदाजांचे कहर प्रदर्शन! अर्शदीपच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद






