आयपीएल 2023मधून बाहेर पडणारा दिल्ली कॅपिटल्स पहिला संघ ठरला. दिल्लीने हंगामातील आपला आठवा पराभव शनिवारी (13 मे) पंजाब किंग्जविरुद्ध स्वाकारला. घरच्या मैदानात दिल्लीला 31 धावांनी पराभव मिळाला. पंजाबसाठी प्रभसिमरन सिंग आणि गोलंदाजी विभागात हरप्रीत बरार मॅच विनर्स ठरले. कर्धणार शिखर धवन याने सामना जिंकल्यानंतर संघातील खेळाडूंचे कौतुक केले.
सामना संपल्यानंतर शिखर धवन (Shikhar Dhawan) म्हणाला, “ज्या पद्धतीने गोलंदाजांनी या सामन्यात संघाला पुनरागमन करून दिले, ते कौतुकास्पद होते. खासकरून फिरकी गोलंदाजांचे प्रदर्शन अप्रतिम होते. चेंडूत डावातील चौथ्या षटकापासूनच टर्न होऊ लागला होता. पण तरीही प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) याने शतक केले. त्याच्या या खेळीमुळेच आम्ही चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकलो.”
हरप्रीत बरार (Harpreet Brar) याने या सामन्यात 4 षटकांमध्ये 30 धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्या. हरप्रीतच्या या प्रदर्शनामुळेच दिल्ली कॅपिटल्स संघाला निर्धारित धावसंख्येवर रोखता आले. याविषय़ी धवन म्हणाला, “मी हरप्रीतला म्हणालो होते, खेळपट्टी संथ गतीची आहे, चेंडू टर्न होत आहे. आपण जर विकेट्स गेऊ शकलो, तर सामन्यात पुनरागमन करू शकतो. खासकरून डेविड वॉर्नरची विकेट महत्वाची होती.” धवन पुढे असेही म्हणाला की, “मी जेव्ह युवा खेळाडूंसोबत असतो, तेव्हा युवा बनून राहण्याचा प्रयत्न करतो. संघातील खेळाडूंनी ज्या पद्धतीचे प्रदर्शन केले, ते कौतुकास पात्र आहे. महत्वाच्या वेली सर्वजण थंड डोक्याने विचार करत होते, ज्याचा आम्हाला फायदाच झाला.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबने 20 षटकांमध्ये 7 बाद 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सल संघ 20 षकांमध्ये 8 बाद 136 धावांपर्यंतच मजल मारू शकला. प्रभसिमरन सिंगने 61 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने एकून 65 चेंडूत खेळले आणि 103 धावा करून विकेट गमावली. दुसरीकडे दिल्लीसाठी कर्णधार डेविड वॉर्नर 27 चेंडूत सर्वाधिक 54 धावा करू शकला. प्रभसिमरन सिंग आणि डेविड वॉर्नर यांच्याव्यतिरिक्त एकही खेळाडू या सामन्यात 21पेक्षा अधिक धावांचे योगदान देऊ शकला नाही. (Shikhar Dhawan’s reaction after defeating Punjab Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऍस्पायर चषक २०२३ । सिटीएफसी पुणे, राहुल एफए, एनडीए युथ स्पोर्टस क्लब, संगम बॉईज उपांत्यपूर्व फेरीत
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकही शतक नाही अन् दोन वर्षांसाठी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड