---Advertisement---

हेटमायरने दिग्गज ऑसी गोलंदाजाच्या चेंडूवर मारला स्कूप शॉट; चाहते म्हणाले, ‘हे राजामाणसांचे छंद’

On: रविवार, जुलै 11, 2021 2:44 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या टी२० मालिकेचा थरार रंगला आहे. या मालिकेत यजमान वेस्ट इंडिजचे खेळाडू पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा चांगलाच समाचार घेताना दिसत आहे. १० जुलै रोजी सेंट लूसिया येथे पार पडलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजने ५६ धावांनी विजय मिळवला. विस्फोटक फलंदाज शिमरॉन हेयमायर या सामना सामन्याचा नायक ठरला. ताबडतोब अर्धशतक झळकावत त्याने सामनावीर पुरस्कारही पटकावला. दरम्यान त्याने मारलेल्या एका फटक्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

२४ वर्षीय हेटमायर संघाची वरची फळी बाद झाल्यानंतर मधल्या फळीत संघाचा डाव सावरण्याचे काम करतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी२० त्याने आपली ही भूमिका अगदी चोखपणे पार पाडली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत अवघ्या ३६ चेंडूत त्याने ६१ धावांची तूफानी खेळी केली. या खेळीसाठी त्याने ४ षटकार आणि २ चौकार मारले.

त्याच्या या उल्लेखनीय खेळीला अजून रंगत तेव्हा चढली; जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर स्कूप शॉट मारला. अगदी अलगदपणे गुडघ्यावर बसत त्याने पॅ़डल स्वीप मारला आणि चेंडूला हवेत पाठवले. त्याच्या या अनपेक्षित फटक्याने सर्वांनाच चकित केले. सोशल मिडियावर अनेकांनी त्याच्या या शॉटला ‘राजमाणसांचे मोठमोठे छंद’ असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/SRisOverrated/status/1414061220412284933?s=20

इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा हेटमायर त्याच्या स्फोटक फलंदाजी शैलीने चाहत्यांची मने जिंकत असते. आता तर आपल्या आयपीएल फ्रँचायझी संघनायक रिषभ पंत याच्या रिव्हर्स स्वीप शॉटची नक्कल करत त्याने सर्वांनाच प्रभावित केले आहे.

दुसरीकडे क्रिकेटजगतातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणला जाणारा स्टार्क खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ टी२० सामन्यात अतिशय महागडी गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या सामन्यात तर त्याने ४ षटके टाकत ४९ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेतली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---