पुणे: मंदार वाकणकर टेनिस अकादमी यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली अरूण वाकणकर मेमोरियल करंडक पुरूष टेनिस 2018 स्पर्धेत पुरुष खुल्या गटात पार्थ चिवटे, रोहित शिंदे, धरणीधर मिश्रा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना कोर्टवर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत पार्थ चिवटे याने वेंकटेश आचार्य याचा 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली. अव्वल मानांकित रोहित शिंदे याने अंशुल सातववर 6-2असा सहज विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित धरणीधर मिश्राने रोहन फुलेचे आव्हान 6-2 असे मोडीत काढले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: हौशी गट: उपांत्यपूर्व फेरी:
रजत परमार वि.वि.अविनाश हूड 6-3;
सौतिक घोष वि.वि.नितीन सावंत 6-5(2);
आर्यन हूड वि.वि. विवेक खडगे 6-2;
पुरुष एकेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
रोहित शिंदे(1)वि.वि.अंशूल सातव 6-2;
मैत्रेयी भगत वि.वि.ओंकार अग्निहोत्री 6-1;
पार्थ चिवटे वि.वि.वेंकटेश आचार्य 6-4;
धरणीधर मिश्रा(2)वि.वि.रोहन फुले 6-2;