पुणे– फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात लक्ष गुजराथी, अभिराम निलाखे, ओमकार शिंदे, पियुश जाधव यांनी तर, मुलींच्या गटात देवांशी प्रभुदेसाई, रितिका मोरे, अभिलिप्सा मल्लिक, श्रावणी देशमुख यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अभिलिप्सा मल्लिक हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित साईइती वराडकरचा 6-3, 7-6(8-6) असा पराभव केला. श्रावणी देशमुखने काल अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या वैष्णवी सिंगचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. चौथ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाईने रिशीता पाटीलचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आठव्या मानांकित रितिका मोरेने श्रीमोई कामतचे आव्हान 6-3, 6-1 संपुष्ठात आणले.
मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित लक्ष गुजराथीने कडवी झुंज देत अवनीश चाफळेचा 4-6, 6-2, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. अभिराम निलाखे याने अमोघ दामलेवर 6-2, 6-4 असा विजय मिळवला. बिगरमानांकीत ओमकार शिंदेने तिसऱ्या मानांकित राघव अमीनचा 3-6, 7-6(2), 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. पियुश जाधवने निमय महाडिकला 6-0, 6-1 असे पराभूत केले.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत अर्णव बनसोडे व अभिराम निलाखे यांनी तिसऱ्या मानांकित मनन अगरवाल व अनिकेत चोभे यांचा 6-3, 6-3 असा तर, अर्जुन कीर्तने व अद्विक नाटेकर यांनी ओमकार शिंदे व अनुज तशीलदार यांचा 6-2, 6-7(6-8), 10-2 असा पराभव केला.
निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी): मुले:
लक्ष गुजराथी[1] वि.वि.अवनीश चाफळे 4-6, 6-2, 6-4;
अभिराम निलाखे वि.वि.अमोघ दामले 6-2, 6-4;
ओमकार शिंदे वि.वि.राघव अमीन[3] 3-6, 7-6(2), 6-4;
पियुश जाधव वि.वि.निमय महाडिक 6-0, 6-1;
मुली:
श्रावणी देशमुख वि.वि.वैष्णवी सिंग 6-2, 6-0;
देवांशी प्रभुदेसाई[4] वि.वि.रिशीता पाटील 6-3, 6-2;
अभिलिप्सा मल्लिक वि.वि.साईइती वराडकर[3] 6-3, 7-6(8-6);
रितिका मोरे[8] वि.वि.श्रीमोई कामत 6-3, 6-1;
दुहेरी: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
लक्ष गुजराथी/स्वराज ढमढेरे[1] वि.वि.अमोघ दामले/शिवम पाडिया 6-2, 6-4;
आशुतोष कवडेकर/निमय महाडिक वि.वि.शार्दूल खवळे/क्रिशांक जोशी 5-7, 6-2, 10-8;
अर्णव बनसोडे/अभिराम निलाखे वि.वि.मनन अगरवाल/अनिकेत चोभे[3] 6-3, 6-3;
अर्जुन कीर्तने/अद्विक नाटेकर वि.वि.ओमकार शिंदे/अनुज तशीलदार 6-2, 6-7(6-8), 10-2;
मुली:
क्षीरीन वाकलकर/दुर्गा बिराजदार वि.वि.भक्ती ताजने/ईश्वरी मार्कंडे[3] 6-1, 6-4;
रिशीता पाटील/श्रीमोई कामत वि.वि.श्रीया साई/निशिता देसाई[4] 6-2, 6-1;
आर्या शिंदे/रिद्धी शिंदे वि.वि.वैष्णवी सिंग/रितिका मोरे[2] 6-4, 2-6, 10-8.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भविष्यात हे नाव…’, एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकणाऱ्या रजत पाटीदारबद्दल विराटचं मन जिंकणारं विधान
आयपीएलच्या झगमगाटात नवी कसोटी क्रमवारी जाहीर; रोहित-विराट-बुमराहला…
क्या मस्त खेला रे तू! विराटच्या नेत्रदिपक चौकाराचं गांगुली, जय शहाकडून कौतुक, रिऍक्शन कॅमेरात कैद