fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

प्रो कबड्डी सीजन ७ च्या अखेरीस महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी.

प्रो कबड्डी सीजन ७ अंतिम टप्पात येऊन पोहचला आहे. एक लेग शिल्लक असून प्ले-ऑफ साठी पाच संघ पात्र ठरले असून १ जागेसाठी यूपी योद्धा व जयपूर पिंक पँथर्स यांच्यात चुरस आहे.

काल (३ ऑक्टोबर) झालेल्या पुणेरी पलटण विरुद्ध तेलुगू टायटन्स सामन्यांत गुणांचा पाऊस पडला दोन्ही संघानी मिळवून १०३ गुण मिळवले. यासामन्यात महाराष्ट्रातील तीन युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

पुणेरी पलटण कडून सुशांत साहिलने चढाईत तर तेलुगु टायटन्स कडून कृष्णा मदने आणि आकाश अरसुल यांनी पकडीत उत्कृष्ट खेळ केला. पुणेरी पलटणच्या सुशांत साहिलने १४ रेड मध्ये ८ टच पॉईंट्स तर १ बोनस पॉईंट्स सह ०९ पॉईंट्स मिळवले. तर पकडीत २ टॅकल पॉईंट्स मिळवले. प्रो कबड्डी मध्ये पहिला सुपर टेनने सुशांतला हुलकावणी दिली.

तर तेलुगु टायटन्स संघाकडून कृष्णा मदने व आकाश अरसुल यांनी प्रो कबड्डीत पहिल्यांदाच हायफाय पूर्ण केले. दोघांनी ५-५ टॅकल पॉईंट्स मिळवले. सीजन ७ च्या अखेरीस मिळालेल्या संधीचा फायदा घेत महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे.

दोन्ही संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले असून संघाचे उर्वरित सामन्यांत पुन्हा एकदा आपला खेळ दाखवण्याची संधी या खेळाडूंना मिळेल.

You might also like