पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील तिस-या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात तिस-या मानांकीत शिवतेज शिरफुले याने, तर मुलींच्या गटात अव्वल मानांकीत ह्रितिका कापळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
सेंटर फॉर पोलिस रिसर्च(सीपीआर), पाषाण येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात तिस-या मानांकीत शिवतेज शिरफुले याने नवव्या मानांकीत नमिश हूड याचा 7-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. आठ वर्षीय शिवतेज हा मुळचा नांदेडचा असून सध्या पुण्यात टॉस अकादमी येथे पार्थ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे.
मुलींच्या गटात अव्वल मानांकीत ह्रितिका कापळेने तिस-या मानांकीत रिशीता पाटील हीचा 7-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
10वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
शिवतेज शिरफुले(3)वि.वि. स्वर्णीम येवलेकर(2) 6-4
नमिश हूड(9)वि.वि. आर्यन कीर्तने 6-3
अंतिम फेरी- शिवतेज शिरफुले(3)वि.वि. नमिश हूड(9) 7-4
10वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
ह्रितिका कापळे(1) वि.वि अविपशा देहुरी(4) 6-3
रिशीता पाटील(3) वि.वि. आस्मि टिळेकर 6-3
अंतिम फेरी- ह्रितिका कापळे(1) वि.वि रिशीता पाटील(3) 7-4