पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे केपीआयटी व आयकॉन यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉन कुमार लिटिल चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत 8 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत शितिज प्रसादने आनंद कामतचा 6-4(6) असा तर रेनाश गुंडने अद्विक झा याचा 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी व फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत 8 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित अकिरा मुदुमदिग्डाने पाचव्या मानांकित वाणी चतुरचा 5-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
झेन गुप्ताने इरा भारद्वाजचा तर चौथ्या मानांकित समायरा ठाकूरने झिया सैफीचा 5-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 14 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित स्वरा जावळेने वसुंधरा बजाजचा 6-1 असा तर नवव्या मानांकित
अस्मी टिळेकरने परी हिंगळेचाचा 6-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. शिबानी गुप्ताने वरस्वातिका ईश्वरचा 6-0 असा तर काव्या देशमुखने काव्या तुपेचा 6-3 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपुर्व फेरी
8 वर्षाखालील मुली:
अकिरा मुदुमदिग्डा वि.वि वाणी चतुर (5) 5-3;
झेन गुप्ता वि.वि इरा भारद्वाज 5-0;
समायरा ठाकूर (4)वि.वि झिया सैफी 5-0;
इश्ना नायडू (6)वि.वि.वंशिका अरगडे 5-3;
8 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
शितिज प्रसाद वि.वि आनंद कामत 6-4(6);
रेनाश गुंड वि.वि अद्विक झा 6-1;
14 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
स्वरा जावळे (1) वि.वि वसुंधरा बजाज 6-1;
अस्मी टिळेकर (9) वि.वि परी हिंगळे 6-0;
शिबानी गुप्ते वि.वि वरस्वातिका ईश्वर 6-0;
काव्या देशमुख वि.वि काव्या तुपे 6-3.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सरफराज खानची ‘फर्स्ट क्लास’ इनिंग, ब्रॅडमन यांना टाकले मागे!
पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूची आईदेखील उतरली क्रिकेटच्या मैदानात; मुलीने पोस्ट करत लिहिले…
तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे युवराज सिंग नाराज, पूजा वस्त्राकरला गमवावी लागली विकेट