IND vs AFG: भारत विरूद्ध अफगानिस्तान दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. गुरुवारी(11 जानेवारी) या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारताने सहा विकेट्सने जिंकला. यावेळी सामनावीर म्हणून शिवम दुबेच्या नावाची घोषणा झाली. त्याने दोन षटकात फक्त 9 धावा देऊन एक विकेट घेतली आणि फलंदाजी करताना 40 चेंडूत नाबाद 60 धावा करत संघाचा विजय निश्चित केला.
एमएस धोनीकडून मी सामन्याचा शेवट करायला शिकलो – शिवम दुबे
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2020 मध्ये निवृत्त झाला. पण यष्टीरक्षक फलंदाज अद्यापही इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. मागच्या वर्षी त्याच्या नेतृत्वात सीएसकेने आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली. शिवम दुबे देखील आयपीएल विजेत्या संघाचा भाग होता. दरम्यान, दुबेला धोनीकडून क्रिकेटचे अनेक धडे शिकायला मिळाले आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर शिवम दुबे (Shivam Dube) म्हणाला, “मी बऱ्याच दिवसांपासून या संधीची वाट पाहत होतो. मी स्वतःला तयार ठेवत होतो. जेणेकरून संधी मिळाली की त्याच सोनं करता याव. जेव्हा मी फलंदाजीला आलो त्यावेळी तेच करण्याचा प्रयत्न केला जे मी माही भाईकडून (एमएस धोनी) सामन्याचा शेवट करण्याविषयी शिकलो होतो. याविषयावर मी त्याच्याशी सतत बोलत असतो. याविषयी काही सल्ले त्याच्याकडून मला मिळाले होते.”
रोहित शर्माविषयी काय म्हणाला शिवम दुबे
समालोचकाशी बोलताना दुबेने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाचही तोंडभरुन कौतुक केले. तो म्हणाला, “रोहीत शर्माने मला परिस्थितीनुसार फलंदाजी करायला सांगीतली. मी कसल्याही परिस्थितून संघाला विजय मिळवून देउ शकतो हा आत्मविश्वास दाखवला. याठिकाणी इतकी थंडी होती की जेव्हा मी फलंदाजी करायला मैदानात आलो तेव्हा बॅट सुद्धा पकडचा येत नव्हती. पण दोन-तीन चेंडू खेळल्यावर मी मैदावर रुळलो.”
अफगानिस्तान विरुद्धची टी20 मालिका विश्वचषकाच्या दृष्टिने महत्वाची
11 जानेवारीपासून सुरु झालेल्या या तीन टी20 मालिकेच भारतासाठी खूप महत्व आहे. या मालिकेनंतर टी20 विश्नचषकापूर्वी भारतीय संघ एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. अशात भारतीय निवड समीतीकडून सर्वोत्कृष्ट 11 ची पडताळणी सुरु झाली आहे. याच कारणाने रोहित शर्मा आणि विराट कोहली जवळपास 14 महिन्यानंतर पुन्हा टी20च्या मैदानात उतरले आहेत.
महत्वाच्या बातम्या
67व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत सांघिक गटात महाराष्ट्र संघाचा अंतिम फेरीत प्रवेश
इंग्लंडमधील लीड्स बेकेट विद्यापीठाचे विद्यार्थी आयएसएमएस इन्स्टिट्यूटला भेट देणार