---Advertisement---

Shivam Dube । ‘आम्हाला माहीत आहे…’, सामनावीर ठरलेल्या दुबेला रोहित काय म्हणाला?

On: शुक्रवार, जानेवारी 12, 2024 4:17 PM
Shivam Dube
---Advertisement---

मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला. उभय संघांतील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने गुरुवारी विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात शिवम दुबे भारतासाठी मॅच विनर ठरला. त्याने गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीच महत्वपूर्ण योगदान दिले आणि सामनावीर पुरस्कार देखील जिंकला. सामना संपल्यानंतर गिने कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती बीसीसीआय टीव्हीवर दिली.

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील या पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान मोहालीमध्ये कडक्याची थंडी होती. दोन्ही संघाच्या खेळाडूंना या सामन्यात थंडीमुळे त्रास झाला. पण शिवम दुबे सुरुवातीच्या काही चेंडूंनंतर नेहमीच्या सामन्याप्रमाणे खेळत राहिला. अफगाणिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 158 धावांपर्यंत मजलम मारली. प्रत्युत्तरात भारताने 17.3 षटकात आणि 4 विकेट्सच्या नुकसानावर हा सामना जिंकला. शिवम दुबे (Shivam Dube) मोठ्या काळानंतर भारतासाठी खेळत असून त्याने संधीचे सोने केले. दुबेने गोलंदाजाच्या रुपात एक विकेट घेतली. तर फलंदाजी करताना 40 चेंडूत 60 धावांची सर्वोत्तम खेळी केली.

सामनावीर ठरल्यानंतर दुबेने या पुरुस्काराचे त्याच्यासाठी असणारे महत्व सांगितले. तो म्हणाला, “मला वाटते ही खेळी खूपच महत्वाची आहे. कारण मोठ्या काळानंतर मी भारतीय संघासाठी खेळत होतो. मसा संधी मिळाली होती आणि अशा प्रकारची खेळी खूप महत्वाची होती. लक्ष्याचा पाठलाग करताना एका फलंदाजाचा नेहमीच हा प्रयत्न असतो की, टी-20 क्रिकेटमध्ये संघासाठी सामन्याचा शेवट आपण करायचा आहे. मी संघासाठी सामन्याचा शेवट केला आणि या खेळीनंतर आनंद वाटला.”

या सामन्यातील खेळीनंतर रोहित शर्माकडूनही दुबेला मार्गदर्शन मिळाले. रोहितसोबत झालेल्या चर्चेची माहिती दुबने बीसीसीआय टीव्हीशी बोलताना दिली. दुबे म्हणाला, “रोहितने माला एकच सांगितले की, अशाच पद्धतीने खेळत राहा. आपल्या खेळात सकारात्मकता कायम ठेव. आम्हाला माहीत आहे की तू कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतोस.”

दरम्यान, दुबेने अफगाणिस्तानविरुद्ध गुरुवारी खेळल्या सामन्याआधीत ऑक्टोबर 2023 मध्ये आपला शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याच्या एकंदरीत कारकिर्दीचा विचार केला, तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये दुबेने 19 सामन्यांमध्ये 212 धावा केल्या आहेत. (Shivam Dube was congratulated by Rohit Sharma after becoming the man of the match)

महत्वाच्या बातम्या – 
नुसता धुराळा! क्रिकेटचा सामना खेळायला डेविड वॉर्नर थेट हेलिकॉप्टरने स्टेडियममध्ये
‘तरुणांकडून संधी हिसकावल्याची चर्चा आहे पण..’, रोहित-विराटच्या टी20 कमबॅकवर डिव्हिलियर्स काय म्हणाला पाहा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---