गेल्यावर्षीपासून शिवम दुबे हे नाव रणजी ट्राॅफीपासून टीम इंडियात सगळीकडे चांगलंच गाजत होतं. विशेष म्हणजे याच काळात हार्दिक पंड्या व विजय शंकर दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने शिवमला लगेच संघात संधीही मिळाली.
जेमतेम १ वनडे व १३ टी२० सामने खेळलेल्या या खेळाडूचा हा प्रवास तसाही चढउतारांचाच राहिला आहे. हार्दिक पंड्याच्या जागी या खेळाडूकडे एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिले जात आहे.
यामुळे शिवमला सतत हार्दिकबरोबरच्या स्पर्धेबद्दल प्रश्न विचारला जातोच. यावर आता शिवमनेही भाष्य केले आहे.
“जेव्हाही मला कुणी विचारत की मी हार्दिकची जागा घ्यायला आलो आहे तेव्हा मी सांगतो मला हार्दिकची जागा घ्यायची नाही. मी चांगले प्रदर्शन करुन संघाला सामने जिंकून द्यायला संघात आलो आहे. हार्दिक एक अनुभवी व महत्त्वाचा खेळाडू आहे. यामुळे तो जेव्हा फिट होईल थेट संघात येईल,” असे यावेळी शिवम म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
–कुणी घर घेता का घर? शेन वाॅर्न विकतोय घर; किंमतही आहे तशीच
–टीम इंडियाचं कर्णधारपद रोहित- विराटमध्ये वाटून दिलं तर...
–बरोबर १३ वर्षांपुर्वी १२७किलो वजनाच्या क्रिकेटपटूने घेतला होता उथप्पाचा नेत्रदिपक झेल, पहा व्हीडिओ