उत्तर प्रदेशचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी याच्यासाठी मागील आठवडा स्वप्नवत राहिला आहे. प्रथम त्याला गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या लिलावात 6 कोटी रुपयांना खरेदी केले. त्यानंतर अवघ्या चारच दिवसांनी त्याची श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात देखील निवड झाली. प्रथमच भारतीय संघात संधी मिळाल्याने तो भलताच खुश आहे. आपल्याला खेळण्याची संधी मिळाल्यास आपण कर्णधाराला निराश करणार नाही असे वक्तव्य त्याने केले.
एका वृत्तसंस्थेची बोलताना शिवम मावी म्हणाला,
“हार्दिक पंड्या प्रत्येक खेळाडूला पाठिंबा देतो. तो एक उत्तम कर्णधार आहे. पहिल्याच प्रयत्नात संघाला आयपीएल विजेता बनणे खूप अवघड आहे. मात्र, त्याने ते करून दाखवले.
तो पुढे म्हणाला, “कर्णधार म्हणून हार्दिक हा हुशार रणनीतीकार आहे. कोणाला कधी गोलंदाजी करायची आणि फलंदाजीचा क्रम काय असावा हे त्याला माहीत असते. माझ्यासाठी ही गोष्ट सोपी नसेल. परंतु, मला आशा आहे की मला सामने खेळायला मिळतील. त्यात चांगली कामगिरी करून भारतासाठी नियमितपणे खेळण्याचा माझा प्रयत्न असेल.”
आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी चांगली कामगिरी न करू शकलेल्या मावीसाठी भारतीय संघापर्यंतचा प्रवास सोपा राहिला नव्हता. केकेआरने मावीला 7 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतलेले. मात्र, तो 10.31 च्या इकॉनॉमी रेटने सहा सामन्यांत केवळ पाच बळी घेऊ शकलेला. त्यानंतर मावीने उत्तर प्रदेशसाठी मर्यादित षटकांच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये छाप पाडली. सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत 10 विकेट घेतल्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही 14 बळी आपल्या नावे केले. त्यामुळेच त्याला सलग तिसऱ्यांदा आयपीएलमध्ये कोट्यावधींची बोली लागली.
(Shivam Mavi Said I Want Chance To Impress Hardik Pandya)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा ‘राशिद राज’! नबीनंतर ‘या’ प्रकारात सांभाळणार नेतृत्वाची जबाबदारी
क्लासिक केन! विलियम्सनच्या नाबाद द्विशतकाने पाकिस्तान बॅकफूटवर; कराची कसोटीला निर्णायक वळण