वेस्ट इंडिज संघाच्या क्रिकेट इतिहासात शिवनारायण चंद्रपॉल याचे एक महत्वाचे स्थान आहे. त्यानेे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संघाचे नाव उंच केले. त्याच्या विषयी जेवढे बोलावे तितके कमीच आहे. 90च्या दशकात वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासात ब्रायन लारा याच्यासोबतच अजुन एका खेळाडूचे नाव होेते, ज्याने वेस्ट इंडिज क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त करुन देण्यात विषेश योगदान दिले. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणाही नसून शिवनारायण चंद्रपॉल आहे. चंद्रपॉलने 2015मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, आता त्याचाच मुलगा तेजनारायण चंद्रपॉल वडीलांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे.
तेजनारायण चंद्रपॉल (Tagenarine Chanderpaul) याला देखील आपल्या वडीलांप्रमाणेे खेळपट्टीवर टीकून राहण्याची कला अवगत आहे. तो देखील त्याच शैलीत फलंदाजी करतो, जसे त्याचे वडील शिवनारायण चंद्रपॉल (Shivnarine Chanderpaul) खेळायचे. आता तेजनारायण चंद्रपॉल याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रधानमंत्री इलेवन संघाविरुद्ध खेळताना 293 चेंडूत 119 धावा केल्या, ज्यात 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याच्या या डावात त्यानेे आधी खेळपट्टीवर जम बसवला आणि नंतर धावा बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचे वडील शिवनारायण चंद्रपॉल हे देखील हीच रणनीती मैदानात वापरायचे आणि तेजनारायणच्या या डावाने त्याच्या वडीलांची झलक दाखवून दिली.
सध्या वेस्ट इंडिज संघ यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेत शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेजनारायण याची देखील निवड झाली आहे. त्याच्याबद्दल असेही म्हटल जात आहे की, ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला प्लेइंग इलेवनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. या संघात 30 नोव्हेंबरला पहिला सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे.
तेजनारायण देखील आपल्या वडीलांप्रमाणे फंलदाजी करताना खेळपट्टीवर स्टंपवरील बेल्स मारुन मार्क केले. चाहते त्यांच्यातील हेच साम्य पाहुन हैरान झाले आहेत आणि सोशल मिडीयावरही यावर चर्चा होताना दिसत आहेे.(Shivnarain Chanderpaul’s son Tagenarain also play like his father)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजा नव्या वादात! टीम इंडियाची जर्सी घालून भाजपचा प्रचार केल्याने विरोधक आक्रमक
नक्की पूर्णवेळ कर्णधार कोण? वर्षभरात रोहितपेक्षा जास्तवेळा शिखरच्या नेतृत्वात खेळलीये टीम इंडिया