पुणे येथे शनिवारी (14 जानेवारी) झालेल्या ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला पराभूत करत ‘महाराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. मात्र, असे असताना माती विभागाच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या सिकंदर शेख याची चर्चा होताना दिसत आहे.
माती विभागाच्या अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड विरुद्ध सिकंदर शेख अशी लढत झाली होती. यामध्ये महेंद्र याने गुणांच्या आघाडीने विजय संपादन केला होता. मात्र, या सामन्याला वादाची किनार लाभली. महेंद्र याने डांग डाव टाकत सिकंदरविरुद्ध 4 गुण मिळवले होते. मात्र, यावर सिकंदरच्या प्रशिक्षकांनी आक्षेप घेत दाद मागितली. त्यावर सिकंदरला एक व महेंद्र याला चार गुण असा निर्णय पंचांनी दिला. त्यामुळे पिछाडीवर असलेला महेंद्र अचानक आघाडीवर गेला. त्यानंतर सिकंदरला ही पिछाडी भरून काढता आली नाही. परिणामी, महेंद्रने सामना आपल्या नावे केला.
मात्र, महेंद्रने टाकलेला डाव केवळ दोन गुणांचा होता अशी चर्चा कुस्ती वर्तुळात होताना दिसत आहे. सिकंदर हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याने त्याला जाणीवपूर्वक महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून बाद करण्यात आल्याचा आरोप अनेकांकडून होताना दिसतोय. सोशल मीडियावरून सिकंदरचे अनेक जण कौतुक करत आहेत. तसेच, पुढील वर्षी तू नक्की महाराष्ट्र केसरी होशील असा दिलासा देतायेत.
सिकंदर शेख हा निकाली कुस्त्यांच्या आखाड्यातील नामवंत मल्ल म्हणून ओळखला जातो. सोलापूरच्या मोहोळ येथील रहिवासी असलेला सिकंदर महाराष्ट्रासह उत्तर भारतात दंगल गाजवत असतो. सध्या लाल मातीतील व निकाली कुस्त्यांच्या आखाड्यातील सर्वोत्तम भारतीय मल्ल म्हणून त्याला ओळखले जाते.
(Shivraj Rakshe Win Maharashtra Kesari But Sikandar Shaikh Won Hearts)
महत्वाच्या बातम्या-
एकदमच टॉपला! सध्या खेळत असलेल्या खेळाडूंत कोणीही नाही विराटच्या आसपास; पाहा ही आकडेवारी
INDvSL: शुबमन गिलच्या शतकाआधी युवराज सिंगने म्हटले, ‘क्रिकेट मरतय का?’; जाणून घ्या कारण