महिला विभागात अंतिम फेरीचा सामना शिवशक्ती महिला संघ मुंबई विरुद्ध महात्मा गांधी स्पो. उपनगर यांच्यात झाला. पहिल्या काही मिनिटातच ७-२ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्ती संघाने लोन टाकत मध्यंतरापर्यत १६-१० अशी आघाडी मिळवली. शिवशक्ती कडून पुजा यादव व रक्षा नारकर ने आक्रमक चढाया केल्या. तर पौर्णिमा जेधेने उत्कृष्ट पकडी करून विजयात मोलाची भूमिका बजावली.
महात्मा गांधी स्पो कडून सायली जाधव आणि सृष्टी चाळके यांनी चांगला खेळ केला पण त्या आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्या. शिवशक्ती संघाने २६-१७ असा विजय मिळवत अंतिम विजेतेपद पटाकवले. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीत शिवशक्ती संघाने ४४-२५ असा संघर्ष, उपनगर संघाचा पराभव केला होता. महात्मा गांधी संघाने ४०-१५ असे अनिकेत रत्नागिरी संघाला नमवले.
पुरुष विभागात एयर इंडिया विरुद्ध महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यात अंतिम सामना रंगला. पहिल्या ५ मिनिटात एयर इंडियाने लोन टाकत १२-०२ अशी आघाडी मिळवत सामन्यावर पकड मिळवली. सुशांत साहिल व असलम इनामदारच्या आक्रमक खेळांने एयर इंडिया संघाने २०-११ अशी मध्यंतरापर्यत आघाडी मिळवली होती.
मध्यंतरानंतर ही एयर इंडियाने आपली आघाडी कायम ठेवत अंतिम फेरीचा सामना ३५-१८ असा एकतर्फी जिंकत मोसमातील तिसरे विजेतेपद पटाकवले. महिंद्रा कडून अनंत पाटील व ऋतुराज कोरवी यांनी चांगला खेळ केला.
त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीत देना बँक संघाचा ६२-५२ असा पराभव करून महिंद्रा संघाने अंतिम फेरीत गाठली होती. एयर इंडियाने रायगड पोलीस संघावर ३४-१९ असा विजय मिळवला होता.
स्पर्धेतील संक्षिप्त निकाल.
शिवनेरी सेवा मंडळ आयोजित सुवर्ण महोत्सवी राज्यस्तरीय व्यवसायिक कबड्डी स्पर्धा २०१९
महिला विभाग
(१) शिवशक्ती महिला संघ, मुंबई शहर
(२) महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगर
(३) संघर्ष क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर
(४) अनिकेत क्रीडा मंडळ, रत्नागिरी
सर्वोत्तम खेळाडु – सायली जाधव (महात्मा गांधी स्पोर्ट्स)
सर्वोत्तम चढाई – पुजा यादव (शिवशक्ती)
सर्वोत्तम पक्कड – पौर्णिमा जेधे (शिवशक्ती )
पुरुष विभाग
(१) एअर इंडिया, मुंबई
(२) महिंद्रा अँड महिंद्रा, मुंबई
(२) रायगड पोलीस, रायगड
(४) देना बँक, मुंबई
सर्वोत्तम खेळाडु – सुशांत साईल (एअर इंडिया)
सर्वोत्तम चढाई – नितीन देशमुख (देना बँक)
सर्वोत्तम पक्कड – ऋतुराज कोरवी (महिंद्रा अँड महिंद्रा)