महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पार पडलेल्या बंड्या मारुती सेवा मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात विजय क्लब, मुंबई संघाचा पराभव करून शिवशंकर, ठाणे संघाने विजेतेपद पटाकवले. स्पर्धेत गणेश जाधवला मालिकवीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अंतिम सामन्यात मुंबई शहराच्या विजय क्लब विरुद्ध ठाणेच्या शिवशंकर कल्याण यादोन संघात लढत झाली. दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेत सुरुवात केली. मध्यंतरा पर्यत १०-१० असा बरोबरीत सामना होता.
उत्तरार्धात शिवशंकर संघाने आक्रमक पवित्रा घेत आघाडी मिळवली. विजय क्लब वर लोन टाकत शिवशंकर संघाने शेवटच्या क्षणी महत्वपूर्ण आघाडी मिळवली. श्रीकांत जाधव, निलेश साळुंखे व गणेश जाधव यांच्या खेळाच्या जोरावर शिवशंकर संघाने २८-२० असा विजय मिळवला. तुषार भोईर व सूरज बनसोडे यांनी चांगल्या पकडी केल्या. विजय क्लब कडून विजय दिवेकर व श्री भारती यांनी चांगले प्रयत्न केले व त्याना संघाला विजय मिळवुन देण्यात अपयश आले.

त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विजय क्लब विरुद्ध स्वास्तिक यांच्यात झालेल्या सामन्यात सुवर्णचढाई विजय क्लबने विजय मिळवला. तर शिवशंकर संघाने जय भारत संघावर ४१-२० असा सहज विजय मिळवला.
संक्षिप्त निकाल:-
विजेतेपद- शिवशंकर कल्याण (ठाणे)
उपविजेते- विजय क्लब (मुंबई शहर)
तिसरा क्रमांक- जय भारत मुंबई शहर, स्वास्तिक (उपनगर)
उत्कृष्ट चढाईपटू– अमित चव्हाण (विजय क्लब)
उत्कृष्ट पकडपटू– विजय दिवेकर (विजय क्लब)
मालिकवीर– गणेश जाधव (शिवशंकर)