---Advertisement---

वयाच्या ४६व्या वर्षी ‘रावळपिंडी एक्सप्रेस’चे मैदानावर पुनरागमन; गोलंदाजी पाहून म्हणाल, अजूनही सर्व तसंच आहे!

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 1:59 PM
---Advertisement---

पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने २०११ विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले होते. ‘रावळपिंडी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या गोलंदाजाने आपल्या कारकीर्दीत अनेक दिग्गज गोलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याला खेळताना पाहण्यासाठी अनेक चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मैदानावर गोलंदाजी करताना दिसून येत आहे.

पाकिस्तान संघाचा ४६ वर्षीय गोलंदाज शोएब अख्तर जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी मैदानात यायचा, तेव्हा अनेक दिग्गज फलंदाजांचा थरकाप उडायचा. त्याने आपल्या कारकीर्दीत सचिन तेंडुलकरपासून ते रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. या व्हिडिओमध्ये देखील तो या वयात त्याच वेगाने आणि आक्रमकतेने गोलंदाजी करताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ, इस्लामाबादच्या नवीन मैदानावरील आहे. एका क्लब सामन्यात शोएब अख्तर गोलंदाजी करताना दिसून येत आहे. त्याची ही गोलंदाजी पाहून, क्रिकेट चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. ज्याप्रकारे तो दिग्गजांना आपल्या गतीने बिट करायचा. तसेच या सामन्यात देखील त्याने गूड लेंथला वेगवान चेंडू टाकला, जो चेंडू टप्पा पडून आत आला आणि फलंदाजाच्या पॅडला जाऊन धडकला.

या व्हिडिओला कॅप्शन देत त्याने लिहिले की, “इस्लामाबादच्या या सुंदर मैदानावर बऱ्याच दिवसांनी गोलंदाजी करून आनंद झाला.”

https://www.instagram.com/p/CUqVqGUgOPL/?utm_medium=copy_link

शोएब अख्तरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 
शोएब अख्तरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ४६ कसोटी सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याला १७८ गडी बाद करण्यात यश आले होते. तर १६३ वनडे सामन्यात त्याने २४७ गडी बाद केले होते. तर टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने १९ गडी बाद केले आहेत. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याला ३ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळलेल्या ३ सामन्यात त्याने ५ गडी बाद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

उमरानच्या वेगापुढे आरसीबीची उडाली भंबेरी, इंप्रेस झालेल्या विराटकडून मिळाली आयुष्यभर जपावी ‘अशी’ भेट

सागरिका घाटगेबरोबर लग्न होण्यापूर्वी ‘या’ अभिनेत्रीसोबत झहीर खानचे तब्बल ७ वर्षे होते प्रेमसंबंध

कौतुकाची थाप तर हवीच! विलियम्सनने बेंगलोरविरुद्धच्या ‘रॉयल’ विजयाचे श्रेय दिले ‘या’ भारतीयाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---