युएई आणि ओमानमध्ये रविवारी (१७ ऑक्टोबर) रोजी ओमान विरुद्ध पापुआ न्यू गीनी सामन्याने टी२० विश्वचषक सुरू झाला. या स्पर्धेत भारत २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि कपिल देव यांच्यासोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. या फोटोमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू झहीर अब्बासही दिसत आहे.
ट्विटरवर फोटो शेअर करत शोएब अख्तरने लिहिले आहे की, ‘सर्वोत्तम खेळाडूंसोबत मजा करताना… जहीर अब्बास, सुनील गावसकर आणि कपिल देव. क्रिकेटच्या मोठ्या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज.’ हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहतेही त्यावर कॉमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहेत.
अख्तरने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो कपिल देव आणि सुनील गावसकर यांना खांद्यावर मालिश करताना दिसत आहे.
Chilling with the best of the best.
The great Zaheer Abbas, Sunil Gavaskar & Kapil Dev.
All set for the cricket ka maha muqabla. #Pakistan #India #WorldCup pic.twitter.com/wmXj6XESMw— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 16, 2021
येत्या २४ ऑक्टोबर रोजी दोन वर्षानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांसमोर येतील. दोन वर्षांपूर्वी २०१९ च्या विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. भारताने हा सामना जिंकला होता. पाकिस्तानने आजपर्यंत टी२० विश्वचषकात भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. टी२० विश्वचषकात दोन्ही संघ ५ वेळा समोरा-समोर आले आहेत आणि भारतीय संघाने पाचही पराभव स्वीकारलेला नाही. २४ ऑक्टोबर रोजी दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना अपेक्षित आहे.
दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या सामन्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला आहे की, ‘मला खात्री आहे की आमचा संघ २४ ऑक्टोबरला होणारा सामना जिंकेल.’
पण दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की,’ असे मोठे दावे करण्यावर मी विश्वास ठेवत नाही.’ तसेच त्याने म्हटले होते की भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल फार विशेष वाटत नाही. सामन्य सामन्याप्रमाणेच हा सामना देखील असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ मधून भारतीय संघासाठी मिळाले तीन अद्भुत खेळाडू, ‘हा’ अष्टपैलू घेऊ शकतो पांड्याची जागा
अश्विनच्या टी२० विश्वचषकासाठीच्या निवडीवर कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन; म्हणाला…