नवी दिल्ली। पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू आणि विवाद यांचं जणू काही खूप जूणं नातं आहे. पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपली बायोग्राफी रीलिझ केली आहे. आपल्या या बायोग्राफीमध्ये त्याने जो खुलासा केला आहे, त्याबद्दल मोठा विवाद उपस्थित झाला आहे.
अख्तरने असा दावा केला आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकणारा सचिन तेंडुलकर आणि कसोटी व वनडे क्रिकेटमध्ये १०००० पेक्षाही अधिक धावा करणारा राहुल द्रविड हे दोघेही खेळाडू भारतीय संघासाठी चांगले खेळाडू होते. परंतु ते दोघेही फलंदाज ‘मॅच विनर’ खेळाडू नव्हते.
सचिन- द्रविड नव्हते ‘मॅच विनर’ खेळाडू
केवळ चाहत्यांनीच नाही तर क्रिकेट जगतातील बऱ्याच दिग्गज खेळाडूंनीही अख्तरच्या या विधानाला बालिश म्हटले आहे.
अख्तरने आपल्या बायोग्राफीमध्ये दावा केला की सचिन (Sachin Tendulkar) आणि द्रविड (Dravid) दोघेही ‘मॅच विनर’ (Match Winner) खेळाडू नाही. कारण सामना संपविण्याची कला त्यांना माहीत नव्हती. इतकेच नाही, तर अख्तरने असाही दावा केला, की सचिन फैसलाबादच्या खेळपट्टीवर त्याच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यापासून घाबरत होता.
माझ्या गोलंदाजीवर घाबरायचा सचिन
अख्तरने आपल्या पुस्तकात लिहिले, “विवियन रिचर्ड्स, रिकी पाँटिंग, ब्रायन लारा आणि यांसारखे अनेक फलंदाज, ज्यांनी आपल्या फलंदाजीने दबदबा निर्माण केला आणि ते खऱ्या अर्थाने ‘मॅच विनर’ खेळाडू होते. सुरुवातीला मी सचिनविरुद्ध गोलंदाजी केली, तेव्हा मला त्याच्यामध्ये सामना जिंकण्याची क्षमता दिसली नाही. मी एका सामन्यात सचिनला वेगवान चेंडू फेकला, तो चेंडू सचिनने खेळलादेखील नाही आणि तो मागे सरला. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. फैसलाबादच्या सावकाश खेळपट्टीवर तो मला घाबरत होता. पुढच्या सामन्यात मी त्याच्या डोक्यावर चेंडू फेकला आणि त्यानंतर त्याला अधिक धावा करता आल्या नाहीत.”
शाहरूख खानने फसवले
अख्तरने आपल्या बायोग्राफीमध्ये बॉलिवूड स्टार किंग खान शाहरूख खान (ShahRukh Khan) आणि आयपीएल फ्रंचायझी कोलकाता नाईट रायडर्सबाबतही (Kolkata Knight Riders) वादग्रस्त दावा केला आहे. त्याने दावा केला, शाहरूख आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी या दोघांना फसवणूक करणारे म्हटले. त्याने पुढे म्हटले, की जेव्हा तो आयपीएलमध्ये केकेआर संघाकडून खेळत होता, तेव्हा त्याला दिले जाणाऱ्या मानधनावर तो खुश नव्हता.
आपल्या पुस्तकात अख्तरने लिहिले, “मी आयपीएलमध्ये मला दिले जाणाऱ्या मानधनावर खुश नव्हता. मी शाहरूखला याबाबतीत बोललो होतो. परंतु त्याने मला नकार दिला. मी शाहरूख आणि ललित मोदी यांचे ऐकायलाच नव्हते पाहिजे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-गोष्ट वेस्ट इंडिजच्या अशा क्रिकेटरची, जो कायमच संघाचा तारणहार ठरला!
-क्रीडा पत्रकार अमोल मचाले यांना य. द. सहस्त्रबुद्धे पुरस्कार जाहीर
-भारतीय संघाचं कोच राहिलेल्या कुंबळेला आजही त्या गोष्टीच फारच वाईट वाटतं