क्रिकेटच्या खेळामध्ये एखाद्या खेळाडूचे कठोर परिश्रम, तंत्र आणि कामगिरी यावरून त्याची पारख होते. त्यांच्या धर्माबद्दल विशेष चर्चा फारच कमी आहे, परंतु जेव्हा एखादा मोठा किंवा प्रसिद्ध खेळाडू त्यासंबंधी काही पाऊल उचलतो तेव्हा त्याची चर्चा सर्वत्र होते. आम्ही अशा काही खेळाडूंबद्दल बोलत आहोत ज्यांनी अचानक त्यांचा धर्म बदलला आणि रातोरात चर्चेचा विषय झाले.
मोहम्मद यूसुफ
पाकिस्तानचा माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू मोहम्मद यूसुफचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्याचे नाव युसुफ योहाना असे होते आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात आला तेव्हा तो ख्रिश्चन धर्मीय होता. पण त्यानंतर 2005 साली युसूफ त्याचा साथीदार सईद अन्वरवर इतका प्रभावित झाला की त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि युसुफ योहानाचा मोहम्मद युसुफ झाला. पाकिस्तानकडून खेळताना युसूफने 381 सामन्यांत 17,300 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 39 शतके आणि 97 अर्धशतके ठोकली.
सूरज रणदीव
श्रीलंकेचा क्रिकेटपटू सूरज रणदीव याचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला आणि त्याचे सुरुवातीला नाव मोहम्मद मार्शुक मोहम्मद सूरज असे आहे. पण नंतर त्यांने इस्लाम सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. यानंतर त्याने 2010 साली आपले नाव बदलून सूरज रणदीव असे ठेवले. 35 वर्षीय फिरकीपटू सूरजने कारकिर्दीत श्रीलंकेकडून 50 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 80 पेक्षा जास्त बळी घेतले.
तिलकरत्ने दिलशान
धर्म परिवर्तन करण्याऱ्यांमध्ये श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू आहे. श्रीलंकेचा स्फोटक फलंदाज तिलकरत्ने दिलशानचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला, पण त्याने वयाच्या 16 व्या वर्षी इस्लाम सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. तथापि, यावेळी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली नव्हती. बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी त्याचे नाव तुवान मुहम्मद दिलशान होते. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल सांगायचे तर त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये ही छाप पाडली होती. दिलशानने क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 497 सामने खेळले आणि 17671 धावा केल्या. या दरम्यान त्याने 39 शतके आणि 83 अर्धशतके झळकावली. याशिवाय त्याने 145 बळीही घेतले आहेत.
वेन पार्नेल
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज वेन पार्नेलचेही नाव आहे. 30 जुलै 2011 रोजी त्यांनी धर्म बदलण्याविषयी माहिती दिली. वेनने इस्लाम धर्म स्वीकारला आणि हा त्याचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगितले. तसेच पुढे सांगितले की, त्याचा सहकारी इम्रान ताहिर आणि हाशिम अमलाशी काही संबंध नाही. धर्म बदलल्यानंतर त्याने आपले नाव बदलून वालिद केले. पार्नेलने दक्षिण आफ्रिकेसाठी 101 सामने खेळले आणि तीनही स्वरूपात 150 बळी घेतले. तथापि, कोलकेप करारावर स्वाक्षरी करून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले.
महमूदुल हसन
धर्म बदलणाऱ्या खेळाडूंमध्ये आशियाई खेळाडू सर्वाधिक आहेत. श्रीलंकेनंतर बांगलादेशी खेळाडू, पाकिस्तानी खेळाडूंनीही त्यांचा धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. वृत्तानुसार बांगलादेशचा 29 वर्षीय क्रिकेटर महमूदुल हसनने इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला. 2008 मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक संघात भाग घेणाऱ्या महमूदुलने 2009 मध्ये श्रीलंका, झिम्बाब्वे आणि इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते. परंतु त्याने अचानक आपले नाव महमूदुल हसन वरुन विकास रंजन दास असे ठेवले आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो कधीच क्रिकेट खेळताना दिसून आला नाही.
विनोद कांबली
महाराष्ट्रातील हिंदू कुटुंबात जन्मलेला विनोद कांबळी हा एक हुशार क्रिकेटपटूपैकी एक खेळाडू. तो सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आहे. 1998 मध्ये त्यांनी एका ख्रिश्चन मुलीशी लग्न केले होते. त्यानंतर त्याचा घटस्फोट झाला. यानंतर त्याने दुसर्यांदा ख्रिश्चन मुलीशी लग्न केले आणि धर्म बदलला आणि तोही ख्रिश्चन बनला. पण कांबळी म्हणतो की, तो अजूनही सर्व धर्मांचा आदर करतो. त्याचा धर्म बदलण्याचा निर्णय वैयक्तिक आहे. त्याने शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 3 हजारहून अधिक धावा केल्या. त्याने सहा शतके आणि 17 अर्धशतकेही झळकावली. शाळेत कांबळीने सचिनबरोबर 664 धावांची विक्रमी भागीदारी रचली होती.
एजी कृपाल सिंह
जर एखाद्या क्रिकेटपटूचा धर्म बदलण्याची चर्चा होत असेल तर पहिले नाव कृपालसिंग यांचे येते. भारताकडून खेळणारे कृपालसिंग दुसरा धर्म स्वीकारणारे जगातील पहिले क्रिकेटपटू असतील. कृपाल 1955 ते 1964 या काळात भारताकडून क्रिकेट खेळले. शीख कुटुंबात जन्मलेल्या कृपाल सिंग यांनी लग्नासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. 50-60 च्या दशकात त्यांनी भारतासाठी 14 कसोटी सामने खेळले. पण त्यांच्या कारकिर्दीच्या मध्यात असतानाच ते एका मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला. एवढेच नव्हे तर त्यांनी आपले नावही अर्नोल्ड जॉर्ज असे ठेवले. यासह त्याने पगडी घालणे देखील थांबवले आणि दाढी काढून टाकली.