नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आयपीएलशी सतत तुलना करत आपली कशी लीग कशी भारी आहे सांगणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमधील अनेक संघांवर विक्रीची वेळ आली आहे. ही गोष्ट दुसरं तीसरं कुणी सांगत नसून पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेच याचा खुलासा केला आहे.
२००८ साली आयपीएलचे (IPL) पहिल्यांदा आयोजन झाले होते. त्याच धर्तीवर जगात अनेक लीगची सुरुवात झाली. २०१५मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ५ संघांना घेवुन पाकिस्तान सुपर लीगची सुरुवात केली होती. सध्या या लीगमध्ये ६ संघ खेळतात.
परंतु सध्या ही लीग आर्थिक संकटात सापडली आहे. पाकिस्तानी टीव्ही चॅनेलशी गप्पा मारताना अख्तरने (Shoaib Akhtar) पीएसलीची (Pakistan Super League) खराब स्थिती सांगितली. पुढील १६-१८ महिने या लीगचे कोणतेही सामने होण्याचीही शक्यता नाही. याचमुळे यातील काही संघमालक आपले संघ विकण्यासाठी उत्सुक आहेत.
“मी जर हिशोब केला तर अंदाजे १६-१८ महिने पीएसएलचे सामने होणार नाहीत. काही लोकांना हे ऐकणं आवडणार नाही. परंतु काही संघमालक आपले संघ विकण्याचा विचार करत आहेत. मला ही लीग वाचावी तसेच सुरु रहावी म्हणून याच्या अर्थ विभागाची मदत करण्यात आनंद आहे,” असे यावेळी शोएब अख्तर म्हणाला.
पीएसएल २०२०चे काही अंतिम टप्प्यातील सामने कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) अंतिम टप्प्यात रद्द करावे लागले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-लवकरच बाप होणाऱ्या हार्दिक पंड्याची ‘आयपीएलची बाप ड्रीम ११’, रोहितला मात्र कर्णधार म्हणून वगळले
-संपुर्ण वेळापत्रक: लाॅकडाऊननंतर सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक
-वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच सामन्यात ज्यो रुट होवू शकतो संघाबाहेर, कारण…