पाकिस्तानचा शोएब अख्तर हा त्या काळातील वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. अख्तरला भारतात खूप पसंत केले जाते. भारत आणि पाकिस्तान याच्यात जेव्हा सामना व्हायचा, तेव्हा अख्तरची सर्वात जास्त चर्चा होते. त्याने नुकताच आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो वीरेंद्र सेहवागबद्दल बोलताना दिसत आहे. तो म्हणाला की, एक दिवस तो सेहवागला खूप मारणार आहे.
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आपल्या वक्तव्यातून पाकिस्तानी खेळाडूंची मस्करी करताना दिसतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये चाहत्यांना जास्त सामने पाहायला मिळाले नाहीत, परंतु जे काही सामने पाहायला मिळाले त्यांच्या ते चाहत्यांच्या लक्षात राहिले आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर दोन्ही व्यक्तिमत्व जवळ-जवळ एकसारखी आहेत. मैदानाबाहेर दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि हे दोन खेळाडू सोशल मीडियावर मस्करी करताना दिसतात.
नुकताच शोएब अख्तर एका युट्यूब चॅनेलवर एका चॅट शोचा भाग होता. यावेळी त्याला सेहवागच्या प्रतिक्रियेवर विचारण्यात आले, तेव्हा त्याला काय उत्तर द्यावे हे समजले नाही. तो म्हणाला, “एखाद्या दिवशी जर सेहवाग भेटला, तर मी त्याला खूप मारेन.”
He should learn from @virendersehwag about giving reply. I'm sure @shoaib100mph will also agree pic.twitter.com/qOTUgSKCon
— Guruprasad Shenoy 🇮🇳 (@guruji_prasad) January 23, 2022
काही काळापूर्वी अख्तरने ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो सुटाबूटात दिसत होता. यावर प्रतिक्रिया देत सेहवाग म्हणाला होता की, “ऑर्डर घे-एक बटर चिकन, दोन नान, एक बीयर.” अख्तरच्या या फोटोवर बोलताना सेहवागने त्याची थट्टा केली होती.
विस्फोटक फलंदाज सेहवागने भारतीय संघासाठी फलंदाजी करताना कसोटी क्रिकेटमध्ये १०४ सामन्यात ८५८६ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २५१ सामन्यात ८२७३ धावा केल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये सेहवागने १९ सामन्यांत ३९४ धाावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने १०४ सामन्यांत २७२८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलची खरी रनमशीन आहे ‘हा’ कर्णधार; धोनी, रोहित, वॉर्नरलाही सोडलंय मागे
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अर्धशतकासह ‘या’ विक्रमात मितालीचा ‘राज’, बनली जगातील पहिलीच महिला क्रिकेटर