मागच्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान क्रिकेटमध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले. मायदेशात पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभूत झाल्यानंतर रमीज राजा यांना पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. राजांच्या जागी नजम सेठी नवीन पीसीबी अध्यक्ष बनले. सेठींनी ही जाबाबदारी स्वीकारून काहीच दिवस झाले असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शाहीद आफ्रिदी याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.
रावलपिंडी एक्सप्रेस नावाने ओखळल्या जाणाऱ्या शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत जबरदस्त राहिली. आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर त्याने क्रिकेट जगतालीत मोठमोठ्या फलंदाजांता त्रिफळा उडवला. अख्तरचा सामना करताना भल्याभल्या खेळाडूंना घाम घुटायचा. अचुकू यॉर्गर आणि घातक बाउंसर ही त्याची प्रमुख हत्यारे म्हणता येतील. 2011 साली वनडे विश्वचषक भारताने जिंकल्यानंतर अख्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यानंतर अख्तरने स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला आणि क्रिकेट जगतातील गडामोडींवर बोलू लगाल. दरम्यानच्या काळात अख्तरने समालोचन देखील केले. पण आता अख्तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या हातात घेऊ इच्छित आहे.
पाकिस्तान क्रिकेटचा अध्यक्ष बनल्यानंतर सुपरस्टार खेळाडूंची संघाकडे कुठलीच कमी राहणार नाही, असे स्वतः अख्तर म्हणाला आहे. माध्यमांशी बोलताना अख्तर म्हणाला की, “मला पीसीबी अध्यक्ष बनायचे आहे आणि पाकिस्तान संघासाठी सुपरस्टार तयार करायचे आहेत. मला पाकिस्तानसाठी सुरुवातील 50 सुपरस्टार बनवायचे आहेत. त्यानंतर त्यांचा आकडा वाढेल, जो पुढे 100, 200 आणि 2000 पर्यंत पोहोचवायचा आहे. पाकिस्तान क्रिकेटचा मी खूप आभारी आहे आणि पुढेही बोर्डाची सेवा करण्याची इच्छा आहे.”
शोएब अख्तरच्या मते सध्याच्या पाकिस्तान संघात एकही सुपरस्टार खेळाडू नाहीये. “सध्या एकही सुपरस्टार नाहीये, कारण त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलताच येत नाही. जर एखादा क्रिकेटपटू कॅमेऱ्यापुढे बोलू शकत नसेल, तर तो प्रदर्शन तरी कसे चांगले करेल,” असे तो पुढे बोलला. अख्तरच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने पाकिस्तानसाठी 46 कसोटी, 163 वनडे आणि 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या या तिन्ही प्रकारांमध्ये अख्तरने अनुक्रमे 178, 247 आणि 19 विकेट्स घेतल्या आहेत. (Shoaib Akhtar expressed his desire to become the President of Pakistan Cricket Board)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या पीवायसी कॅरम लीग 2023 स्पर्धेत थॉर, ब्लॅक पँथर्स संघांची विजयी सलामी
दिल्ली कसोटी गमावताच पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडला भारत! वाचा संपूर्ण प्रकरण