टी-२० विश्वचषकातील अंतिम १२ संघांतील सामन्यांना शनिवारी (२३ ऑक्टोबर) सुरुवात झाली. २४ ऑक्टोबरला विश्वचषकात एक महत्त्वाचा सामना पार पडणार आहे, ज्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांशी भिडणार आहेत आणि विश्वचषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात करणार आहेत. अनेकांनी या सामन्याविषयी त्यांची मते मांडली आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या सामन्याविषयी एक विधान केले आहे.
पाकिस्तान आणि भारत यांच्यात टी-२० विश्वचषकात आजपर्यंत झालेल्या सामन्यांचा विचार केला, तर भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तानवर वर्चस्व निर्माण केलेले पाहायला मिळते. असे असले तरी, शोएब अख्तरने एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीचा शॉर्ट व्हिडिओ त्याने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून शेअर केला आहे. शोएब अख्तरने व्हिडिओ सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आता न्युझीलंडला पळू द्यायचे नाही, पण भारतालाही सोडायचे नाही.”
New Zealand ko nahi bhaagnay dena ab. Lekin chorna India ko bhi nahi hai 🙂 https://t.co/1ACLlIYwmr
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 23, 2021
भारत आणि पाकिस्तान संघ टी२० विश्वचषकात आतापर्यंत एकूण पाच वेळा भिडले आहेत आणि यामध्ये पाचही वेळेस भारताने बाजी मारली आहे. तसेच ५० षटकांच्या विश्वचषकात उभय संघ एकमेकांविरोधात आतापर्यंत सात वेळा आमने-सामने आले आणि यामध्येही भारतीय संघानेच बाजी मारली आहे.
दरम्यान, भारतीय संघाने विश्वचषकातील सराव सामन्यात ज्याप्रकारचे प्रदर्शन केले आहे, त्यामुळे यावर्षी संघ जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे. भारताने या दोन सराव सामन्यांमध्ये पहिल्यांदा इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाला मात दिली. या सामन्यांमध्ये केएल राहुल, रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी संघासाठी चांगली फलंदाजी केली, तसेच रविचंद्रन आश्विन आणि जसप्रीत बुमराहनेही उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. अशात विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजयाची घोड दौड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला नेहमीच केलयं चितपट; वाचा सर्व विजयांची कहाणी
ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या ‘हाय व्होल्टेज’ लढतीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, पाहा कोण इन कोण आऊट






