---Advertisement---

एका शब्दात रोहितची ओळख..? चाहत्याच्या प्रश्नावर पाकिस्तानी दिग्गजाने दिले मन जिंकणारे उत्तर

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 6:01 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक घडीवर आहे. दोन्ही संघांनी पहिल्या दोन सामन्यात प्रत्येकी एक विजय मिळवत मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे. त्यामुळे ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. त्यातही विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा याचे आगमन झाल्याने भारतीय संघाचे पारडे जड झाले आहे. अशात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने रोहितप्रती आपले विचार मांडले आहेत.

रविवारी (०३ जानेवारी) अख्तरने ट्विटरवर चाहत्यांची प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान एका चाहत्याने त्याला प्रश्न केला की, ‘एका शब्दात रोहितविषयी तुझे तुमचे सांगा.’ यावर अख्तरने त्या चाहत्यासह सर्व भारतीय क्रिकेट रसिकांनी मने जिंकणारे उत्तर दिले. अख्तरने लिहिले की, “रोहितविषयी एका शब्दात माझे विचार स्पष्ट करण्याजोगा शब्दच अजून बाजारात आलेला नाही. जेव्हा असा कोणता शब्द बाजारामध्ये येईल, तेव्हा मी नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देईल.”

अर्थातच अख्तरने अप्रत्यक्षपणे रोहितचे कौतुक केले आहे. रोहितची प्रतिभा, त्याचे कौशल्य, त्याची कामगिरी इतकी मोठी आहे की, ती एका शब्दात सांगण्याइतका मोठा शब्दच नाहीये, असे त्याने म्हटले आहे.

https://twitter.com/shoaib100mph/status/1345741931377258496

अजिंक्य रहाणेचेही केले कौतुक

एवढेच नव्हे तर, त्या प्रश्न-उत्तरांच्या सेशनदरम्यान अख्तरने भारतीय कसोटी संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेचेही तोंडभरून कौतुक केले. “रहाणेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात पराभूत करण्याची क्षमता राखतो. त्यामुळे बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज जिंकून येण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा,” असे अख्तरने म्हटले आहे.

पहिल्यांदाच दोन मुंबईकर सांभाळणार भारतीय संघाची मोठी पदे

७ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन मुंबईकर भारतीय संघाची महत्त्वाची पदे सांभाळणार आहे. पालकत्त्व रजा घेऊन भारतात परतलेल्या विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणे भारतीय संघाच्या नेतृत्वाची कमान सांभाळत आहे. तर रोहितचे संघात पुनरागमन झाल्यानंतर त्याची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती झाली आहे.

हे दोन्ही खेळाडू महाराष्ट्राची राजधानी मुंबई या शहरातील रहिवासी आहे. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मुंबईकर संघातील दोन मोठी पदे सांभाळताना दिसतील.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्मासाठी कुणाला मिळणार टीम इंडियातून डच्चू? ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला लागली उत्सुकता

…तरीही रोहित शर्मा, रिषभ पंत आणि शुबमन गिल सिडनी कसोटीत खेळणार

…तर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा बनू शकतो पहिलाच क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---