भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यापैकी पहिले दोन सामने संपन्न झाले आहेत. मात्र भारतीय संघाचा प्रमुख सलामी फलंदाज रोहित शर्मा या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित खेळताना दिसू शकतो. त्याचबरोबर रोहित शर्मा या सामन्यात एका विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुरुवातीला कोणत्याच संघात निवड झाली नव्हती. त्यामुळे खूप चर्चेला उधाण आले होते. त्याचबरोबर हे सांगण्यात आले होते की, तो फिट नसल्यामुळे त्याची निवड करण्यात आली नव्हती. मात्र त्यानंतर बीसीसीआयने त्याचा कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यासाठी संघात समावेश केला.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 2019 पासून भारतीय संघाचा सलामी फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली होती. त्याने पाच कसोटी सामन्यांत तीन शतकीय खेळ्या केल्या होत्या. ज्यामधे त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम 212 धावांची खेळी केली होती. रोहित शर्मा एकदा स्थिरावला दमदार खेळी करण्यासाठी ओळखला जातो.
रोहित हा इतिहास रचण्याच्या अगदी जवळ
रोहित शर्मा सर्वात जास्त षटकार ठोकण्यात सध्या आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 423 षटकारांची नोंद आहे. त्याचबरोबर तो भारताकडून सर्वाधिक जास्त षटकार ठोकणारा फलंदाज आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित पहिला क्रमांकाचा खेळाडू आहे. रोहितने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 99 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे त्याने जर तिसऱ्या कसोटी एक जरी षटकार खेचला, तर तो आपले षटकांरांचे शतक पूर्ण करेल. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप 5 फलंदाज
रोहित शर्मा – 99 षटकार
ओयन मॉर्गन – 63 षटकार
ब्रॅडन मॅक्क्युलम- 61 षटकार
सचिन तेंडुलकर- 60 षटकार
एमएस धोनी – 60 षटकार
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहित शर्माने सर्वात जास्त षटकार ठोकलेत
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक जास्त षटकार ठोकणारा फलंदाज रोहित शर्मा आहे. या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत रोहितने 6 डावात 20 षटकार खेचले आहेत. या यादीत मयंक अगरवाल दुसर्या स्थानी आहे त्याने या स्पर्धेत 18 डावात 17 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर तिसर्या क्रमांकावर रविंद्र जडेजा आहे. त्याने 12 डावात 10 षटकार लगावले आहेत.
रोहित शर्माने आतापर्यंत 32 कसोटी सामन्यात 52 षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मावर होतायत ‘बीफ’ खाल्याचे आरोप, सोशल मीडियावर कथित बील व्हायरल