बुधवारी (9 नोव्हेंबर) सिडनी येथे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) संघात टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तान संघ तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकाची अंतिम फेरी खेळेल. या विजयानंतर पाकिस्तानचे आजी-माजी क्रिकेटपटू संघाचे अभिनंदन करत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय संघही अंतिम फेरी पोहचावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पाकिस्तान संघाने सिडनी येथे झालेल्या उपांत्य फेरीचा सामन्यात न्यूझीलडला अक्षरशः एकतर्फी सामन्यात पराभूत केले. या विजयाने पाकिस्तानी चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना पाकिस्तान संघाचे अभिनंदन केले. तसेच, भारतीय संघ देखील अंतिम फेरीत येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
तो म्हणाला,
“पाकिस्तान संघ आता मेलबर्नला पोहोचला आहे. तुम्हीही या. यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आता मला अपेक्षा आहे की, भारतीय संघ देखील अंतिम सामना खेळण्यासाठी येथे येईल. 1992 मध्ये पाकिस्तानने इंग्लंडला हरवून विश्वचषक जिंकला होता. मात्र, यंदा भारत-पाकिस्तान अंतिम सामना हवा अशी माझी इच्छा आहे. सारे जग आतुरतेने वाट पाहत आहे असा सामना खेळूया.”
भारतीय संघ दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडशी दोन हात करेल. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी ऍडलेड येथे होईल. भारतीय संघाने 2007 मध्ये पहिल्यांदाच आयोजित झालेला टी20 विश्वचषक पाकिस्तानला पराभूत करून जिंकलेला. त्यामुळे 15 वर्षांनी पुन्हा एकदा या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांना आमने-सामने पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. (Shoaib Akhtar Hoping India Pakistan Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! पंचांनी एकाच फलंदाजाला 2 चेंडूंवर दोन वेळा दिले आऊट, पण असं घडलं तरी कसं?
पाकिस्तान फायनलमध्ये! न्यूझीलंडच्या विश्वविजयाच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा