Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अख्तर पाहतोय दिवास्वप्न! म्हणाला, “मुंबईत पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवून विश्वचषक जिंकायला हवा”

March 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
shoaib-akhtar

Photo Courtesy: Twitter


पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा सातत्याने आपल्या विधानांनी चर्चेत असतो. आपल्या कारकिर्दीतील अनेक घटना तो अनेक वेळा सार्वजनिक करताना दिसतो. असाच एक किस्सा त्याने शेअर केला आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की भारतीय संघाने त्याच्या एका स्वप्नाचा कसा चक्काचूर केला होता.

आयसीसीने 2011 वनडे विश्वचषक भारत,, श्रीलंका व बांगलादेशमध्ये आयोजित केला होता. या विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत विश्वचषक आपल्या नावे केलेला. भारतीय संघाने उपांत्य फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केलेले. नेमके याच गोष्टीचे दुःख अख्तर याला आहे. एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला,

“2011 वन डे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मोहाली येथे भारताकडून झालेला पराभव माझ्या जिव्हारी लागला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आठ महिन्यांनी मिळू शकते. माझी इच्छा आहे की भारतात विश्वचषक सुरू आहे. पाकिस्तान संघ भारताला चोपतोय. वानखेडे स्टेडियमवर पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजतेय आणि भारताला हरवून आपण विश्वचषक जिंकून चाललो आहोत. थँक्यू व्हेरी मच भारत आम्ही आमचा विश्वचषक घेऊन चाललो आहोत.‌ कशाही पद्धतीने जिंकू, फक्त यावेळी पाकिस्तान विश्वचषक जिंकायला हवा.”

भारतीय संघाने 2011 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानला 30 धावांनी पराभूत केलेले. अख्तर त्या संघाचा भाग होता. मात्र, त्याला उपांत्य सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली. सध्या तो आपल्या यु ट्युब चॅनलवर क्रिकेट समीक्षण करताना दिसतो.

(Shoaib Akhtar Hoping Pakistan Won 2023 ODI World Cup After Beating India At Wankhede Stadium)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच
सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत 


Next Post
Photo Courtesy: Twitter

युपी वॉरियर्झचा धक्कादायक निर्णय! मॅचविनर हॅरिसला बसवले बाकावर‌, चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल

Photo Courtesy: Instagram/Ellyse Perry

बुरा ना मानो होली है! आरसीबीच्या विदेशी खेळाडू रंगल्या धूळवडीच्या रंगात, स्मृतीने...

अंकिता-प्रार्थना जोडीचा KPB ट्रस्ट ITF महिला ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143