---Advertisement---

आयसीसीने घेतली शोएब अख्तरची फिरकी, वैतागलेल्या अख्तरनेही भरला आयसीसीला दम

On: शनिवार, मे 16, 2020 4:51 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परंतु तो यावेळी तो आयसीसीने ट्रोल केल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

खरंतर अख्तरने म्हटले होते की, तो ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) ३ घातक बाऊंसर टाकल्यानंतर चौथ्या चेंडूवर बाद करू शकतो. अख्तरने केलेल्या या दाव्यानंतर आयसीसीने बास्केटबॉल स्टार मायकल जॉर्डनचा फोटोचा वापर करत त्याला ट्रोल केले आहे. ट्रोल केल्यानंतर अख्तरने आयसीसीवर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.

आयसीसीने (ICC) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ३ फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्या फोटोत जॉर्डन (Michael Jorden) खाली काहीतरी पाहताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत अख्तरचा ट्वीट आहे. तसेच तिसऱ्या फोटोत जॉर्डन हसताना दिसत आहे.

https://twitter.com/ICC/status/1260104021060304896

आयसीसीचे ट्वीट अख्तरला (Shoaib Akhtar) आवडले नाही. तो म्हणाला की, आयसीसीची अशाप्रकारची प्रतिक्रिया त्याला आवडलेली नाही.

अख्तरने ट्वीट करत लिहिले की, “या प्रतिकात्मक ट्वीटमधून दिसते की, कशाप्रकारे आयसीसीने तटस्थतेशी नाते तोडले. खरंतर अशाच प्रकारे तेथील कामकाज चालते.”

https://twitter.com/shoaib100mph/status/1260521515898077185

यानंतर अख्तरने व्हिडिओ ट्वीट करत त्यामध्ये लिहिले होते की, “प्रिय आयसीसी, काहीतरी नवीन मिम्स किंवा ईमोजी शोधा. माफ करा मला कोणताच मिळाला नाही. मला केवळ काही खरे व्हिडिओ मिळाले.”

https://twitter.com/shoaib100mph/status/1260589706552717314

अख्तरने आपल्या कारकीर्दीत एकूण ४६ कसोटी सामने, १६३ वनडे सामने आणि १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत १७८ विकेट्स, वनडेत २४७ आणि टी२०त १९ विकेट्स घेतल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-बंदी घातलेला क्रिकेटपटू म्हणतोय, मला भारताला जिंकून द्यायचाय २०२३चा विश्वचषक

-कोहलीसोडून टीम इंडियाचे कर्णधार होण्यासाठी तयार असलेले ३ खेळाडू

-या कंपनीने दिला होता सचिनला धोका, आता मागावी लागली थेट माफी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---