लवकरच इंडियन प्रीमियर लीगला पंधराव्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. पाच वर्षांनंतर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांना वगळता आयपीएलला नवा विजेता संघ मिळेल. आयपीएल ट्रॉफीसाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असतील. तत्पूर्वी गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्याबाबत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने लक्षवेधी भविष्यवाणी केली आहे.
अख्तरचा (Shoaib Akhtar) दावा आहे की, गुजरातला (Gujrat Titans) त्यांच्या पहिल्याच आयपीएल हंगामात अंतिम सामन्यापर्यंत (IPL 2022 Final) पोहोचवणारा हार्दिक (Hardik Pandya) लवकरच भारतीय संघाचेही नेतृत्त्व करेल.
हार्दिकने आपल्या नेतृत्त्वाने आयपीएलमध्ये जबरदस्त छाप सोडली आहे. नेतृत्त्वाचा कोणलाही अनुभव नसताना त्याने गुजरातला आयपीएल २०२२च्या साखळी फेरीतील १४ पैकी १० सामने जिंकून दिले आहेत. साखळी फेरीतील जबरदस्त प्रशर्नानंतर गुजरातने पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सला ७ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे.
आयपीएलमधील त्याची नेतृत्त्व कामगिरी पाहता त्याला भारताच्या येत्या आयर्लंड दौऱ्यासाठी संघाचा कर्णधार बनवला जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान रावळपिंडी एक्सप्रेस अख्तरला असे वाटते की, हार्दिक लवकरच भारतीय संघाची कमान सांभाळू शकतो. कारण भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणखी किती वर्षे संघाचे नेतृत्त्व हे माहिती नाही.
हार्दिक पंड्याने कर्णधार म्हणून स्वत:ला केले सिद्ध
स्पोर्ट्सकिडाशी बोलताना अख्तर (Shoaib Akhtar About Hardik Pandya Captaincy) म्हणाला की, “हे खरे आहे की, हार्दिक आपली वेगळी छाप सोडत आहे. तो भारतीय संघाच्या नेतृत्त्वपदाचा दरवाजा ठोठावत आहे. कोणालाही माहिती नाही की, रोहित शर्मा केव्हापर्यंत भारतीय संघाचा कर्णधार बनून राहिल. भारतीय संघाचे नेतृत्त्व करणे तसे सोपे काम नाही. पण हार्दिकने कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. असे असले तरीही, हार्दिकला त्याची फिटनेस आणि गोलंदाजीवर काम करण्याची गरज आहे.”
“जेव्हापर्यंत हार्दिक पूर्णपणे फिट आहे, तेव्हापर्यंत तो भारतीय संघात त्याच्यासाठी आपोआप जागा बनत जाईल. मात्र केवळ फलंदाज म्हणून त्याच्यासाठी भारतीय संघात जागा नाहीय,” असेही अख्तरने पुढे म्हटले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL फायनलसाठी गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीसाठीही तयार राशिद खान; म्हणतोय…
IPL 2022 मध्ये शेवटच्या वेळी एकत्र जमला आरसीबी संघ, दिनेश कार्तिकने जिंकले चाहत्यांचे मन






