गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचे ६ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले होते. त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरीदेखील त्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम राहील. ५० हजाराहून अधिक गाणे गाणाऱ्या लता मंगेशकरांच्या मृत्युनंतर भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेे (Shoaib Akhtar) देखील भावनिकरित्या लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “मी काहीतरी कामानिमित्त २००६ मध्ये भारतात गेलो होतो. मी देखील लता मंगेशकर यांचा चाहता आहे. मुंबईत असताना माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं. ज्यावेळी मी त्यांना ‘लता जी..’ असे करून बोलावले त्यावेळी त्या मला म्हणाल्या की, मला ‘आई’ असं म्हण. मी त्यांची तबीयत कशी आहे याबद्दल विचारले होते. त्यांनी मला माझ्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल विचारपूस केली. त्यानंतर त्या म्हणाल्या की, ‘मी तुला ओळखते, मी तुझे आणि सचिनचे सामने पाहिले आहेत. तुझा रागीट स्वभाव खूप प्रसिद्ध आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी जेव्हा लता जी यांना भेटण्यासाठी विचारले त्यावेळी त्यांनी मला नवरात्री नंतर भेटण्याचे वचन दिले होते. कारण त्यावेळी ते उपवास करत होते. त्यानंतर मी पाकिस्तानला परतलो. त्यांना न भेटण्याचा खंत नेहमीच माझ्या मनात राहील.”
लता मंगेशकर यांना क्रिकेट पाहण्याची खूप आवड होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्यांना आई असे म्हणायचे. तसेच भारतीय संघाचा प्रत्येक सामना ते टीव्हीवर पाहत असे. त्यांनी सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्याची मागणी केली होती. तसेच एमएस धोनीला निवृत्ती घेऊ नकोस अशी विनंती देखील केली होती.
महत्वाच्या बातम्या :
कायरन पोलार्ड स्लेज करत सूर्यकुमारला काय म्हणाला होता? स्वतः सूर्यकुमारने केला खुलासा
पहिल्या २ कसोटीत १२वा खेळाडू म्हणून खेळवले, पुढे संधी मिळताच ठोकले लागोपाठ ३ शतक
अंडर १९ संघातील खेळाडू भविष्यात हिट होण्यासाठी बीसीसीआयचा ‘मास्टरप्लॅन’, एकदा पाहाच