पाकिस्तान सुपर लीगचा सहावा हंगाम येत्या २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे या हंगामासाठी एक नवीन गीत तयार केले गेले आहे. परंतु या गीतावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने नाराजी व्यक्त केली आहे. या गीताने पीएसएलच्या ब्रँडची पातळी वाढण्याऐवजी ती अधिक खालावल्याचे त्याने म्हटले आहे. सोबतच इतके खराब गीत कोणी बनवले? असा प्रश्न देखील त्याने उपस्थित केला गेला.
शोएबने आपल्या सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ शेअर आहे. या व्हिडिओत त्याने ज्या निर्मात्याने हे गीत बनवलं त्याचाबद्दल देखील त्याने वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, “हे राष्ट्रगीत इतकं घाणेरडं आहे की ते ऐकून माझी मुले माझ्याशी गेल्या दोन दिवसांपासून बोलत नाहीत. पीसीबीचा असा कोणता माणूस आहे, ज्याने अशा प्रकारचे गाणे करण्यास संमती दिली आहे? या गीताची रचना आणि हे गीत दोन्हीही चांगले नाही.”
शोएब पुढे म्हणाला की, “ज्या व्यक्तीने हे गाणे बनवले त्याला याचा अर्थ देखील माहीत नसणार. असे गाणे बनवायला लाज वाटायला हवी. मी त्या व्यक्तीवर खटला नक्कीच दाखल कारणार आहे.”
https://twitter.com/shoaib100mph/status/1359465879189262337?s=20
कोरोना महामारी नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्टेडियममध्ये २० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. बोर्डाच्या निर्णयानुसार पीसीएलच्या प्रत्येक सामन्याच्या दिवशी कराची नॅशनल स्टेडियम मध्ये ७००० प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तर लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुमारे ५५०० प्रेक्षकांना सामना पाहण्यास सहमती दिली जाईल. पीएसएल २०२१ ची सुरुवात २० फेब्रुवारी पासून होईल तर अंतिम सामना हा २२ मार्चला असेल.
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला ‘तेंडुलकर-कूक ट्रॉफी’ नाव द्या, पाहा कुणी केलीय ही मागणी
जाफर यांच्या राजीनामा प्रकरणाला धक्कादायक वळण, धर्माच्या आधारावर खेळाडूंची निवड केल्याचा आरोप






