---Advertisement---

धोनी फेअरवेल सामन्यासाठी हापापला नव्हता, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचा बीसीसीआयवर हल्लाबोल

---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयने कॅप्टनकूल एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल कसलीही योजना आखली नव्हती. पण, शनिवारी स्वत: धोनीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या अशा अनपेक्षित निर्णयामुळे चाहते खूप निराश झाले.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नुकतीच बीसीसीआयकडे धोनीच्या निवृत्ती सामन्याची मागणी केली होती. अशात, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने धोनीला निवृत्तीचा सामना न खेळायला मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले आहे. Shoaib Akhtar Statement On MS Dhoni Farewell Match

अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले की, “धोनीला निवृत्तीच्या सामन्याची भूक नव्हती. पण बीसीसीआयने त्याच्या उपलब्धींना पाहून असे करायला नको होते. एक खूप मोठे नाव, एक खूप मोठा व्यक्ती आणि एक खूप कर्णधार ज्याने सिद्ध करु दाखवले की, भारतीय संघ केवळ मायदेशात नव्हे तर परदेशातही सामने जिंकू शकतो. मला विश्वास होता की त्याला निवृत्तीचा सामना खेळायला मिळेल. भारतासाठी आपल्यातील क्षमतांना ओळखण्यासाठी आणि श्रेय देण्यासाठी त्याला जबरदस्त निरोप मिळायला पाहिजे होता.”

याव्यतिरिक्त बोलताना अख्तरने धोनीसोबतचा एक जुना किस्सा सांगितला. अख्तर म्हणाला की, “धोनी २२ वर्षांचा होता जेव्हा तो पाकिस्तानला आला होता. त्याला माझ्यासोबत बाईकवर बाहेर जायचे होते. पण, मी शूटींगमध्ये थोडा व्यस्त होतो, म्हणून मी त्याला नकार दिला होता. त्यानंतर फैसलाबादच्या एका सामन्यात मला त्याला बाद करायचे होते. पण, तो माझ्या गोलंदाजीवर चारही दिशांना शॉट्स मारू लागला. तेव्हा मला समजले की, धोनी खूप निडर आहे. त्याच्या चेहऱ्यावर थोडीशीही भीती नव्हती की, माझा चेंडू त्याला लागेल.”

महत्त्वाच्या बातम्या – 

‘धोनीने बदलला होता भारतीय क्रिकेटचा चेहरा,’ माजी पाकिस्तानी क्रिकेटरने केली धोनीची प्रशंसा

‘ती’ गोष्ट मात्र धोनीला टी२० क्रिकेटमध्ये कधीच मिळवता आली नाही; राहील नेहमीच खंत

‘देशाचा रत्न’ एमएस धोनीला मिळायला हवा ‘भारतरत्न’ पुरस्कार, पहा कोणी केली मागणी

ट्रेंडिंग लेख –

या ३ विदेशी खेळाडूंची उणीव जाणवणार यावर्षी आयपीएलमध्ये

कोरोनामुळे निधन झालेल्या भारताच्या पहिल्या ‘वॉल’ बद्दल फारशा माहिती नसलेल्या १० गोष्टी

धोनी- रैनाप्रमाणे फेअरवेलची मॅच न खेळताच क्रिकेटला राम राम ठोकणारे ५ भारतीय दिग्गज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---