---Advertisement---

‘धोनीने बदलला होता भारतीय क्रिकेटचा चेहरा,’ माजी पाकिस्तानी क्रिकेटरने केली धोनीची प्रशंसा

---Advertisement---

भारतीय संघाचा ‘कॅप्टन कूल’ धोनीने सर्वांना आश्चर्यचकित करत शनिवारी (१५ ऑगस्ट) आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता सर्वच क्षेत्रांतून अनेक दिग्गजांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकनेही धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. मिस्बाहने धोनीला महान कर्णधार म्हटले आहे. सोबतच त्याने पुढे म्हटले की, धोनीने भारतीय क्रिकेटला पूर्णपणे बदलून टाकले आहे.

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, मिस्बाहने धोनीची प्रशंसा करत म्हटले की, त्याने शानदाररीत्या भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. तो म्हणाला, “धोनी भारतीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. त्याने चांगल्याप्रकारे भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. माझ्या मते तो एक महान खेळाडू आहे. त्याने भारतीय क्रिकेटचा दृष्टीकोन बदलला आहे. त्याने भारतीय संघासाठी वनडे विश्वचषक, टी२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकाविले आहे.”

“ज्याप्रकारे धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, ते निश्चितच प्रशंसा करण्याजोगं आहे. त्याने भारतीय संघाला चांगले नाव मिळवून दिले आहे. सीनियरपासून ज्यूनियर खेळाडूंमध्ये चांगले बदल केले आहेत. त्याने भारतीय संघाचे वातावरण आणि चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्याने क्रिकेटची खूप सेवा केली आहे,” असेही तो पुढे म्हणाला.

एमएस धोनी आणि मिस्बाहने अनेक विश्वचषकात केला आहे एकमेकांचा सामना 

२००७च्या टी२० विश्वचषकातील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान संघात झाला होता. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व धोनी करत होता. धोनीच्याच नेतृत्वात भारताने टी२० विश्वचषकावर आपली मोहोर लावली होती.

त्यावेळी पाकिस्तानकडून मिस्बाह शेवटपर्यंत क्रीजवर उभा होता. परंतु शेवटच्या षटकात तो एक चूकीचा शॉट खेळत बाद झाला होता आणि भारत विश्वविजेता बनला होता.

धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त एक शानदार फिनिशर म्हणूनही आपली छाप सोडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-धोनीचा पहिला कर्णधार सौरव गांगुलीने केली भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘प्रत्येक चांगली गोष्ट…’

-‘फिनिशर’ धोनीने वनडेत केला आहे असा कारनामा, जो कोणाच करता आला नाही

-धोनीच्या निवृत्तीनंतर रिषभ पंतचे वाढले टेंशन; जाणून घ्या काय आहे कारण

ट्रेंडिंग लेख-

-कोरोनामुळे निधन झालेल्या भारताच्या पहिल्या ‘वॉल’ बद्दल फारशा माहिती नसलेल्या १० गोष्टी

-लॉकडाऊनमध्ये ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना मिळाल्या त्यांच्या जीवनसंगिनी

-रैना तू मात्र चुकलास…!!!!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---