कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान चाहत्यांना क्रिकेटपटूंची नवीनवी रुपे पाहायली मिळायली. कोण किचनमध्ये स्वयंपाक बनवताना दिसले, तर कोण साफ सफाई अथवा कपडे धुण्यात कुटुबांची मदत करताना दिसले. काहींनी तर, टिकटॉक आणि यूट्यूब अशा सोशल माध्यमांचा वापर करत आपल्या डान्स आणि फिटनेसच्या व्हिडिओंनी चाहत्यांचे मनोरंजन केले.
लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा काही क्रिकेटपटूंनी तर खूप चांगला उपयोग केला आहे. तो असा की, त्यांनी त्यांच्या नव्या जीवन प्रवासाची सुरुवात केली. एकंदरीत सांगायच झालं तर, काही भारतीय क्रिकेटपटूंना लॉकडाऊनमध्ये त्यांची जीवनसाथी मिळाली आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी या गोड बातमीची घोषणा करत सर्वांना चकित केले.
या लेखात, त्या ३ भारतीय खेळाडूंविषयी आपण पाहणार आहोत, ज्यांनी लॉकडाऊनच्या ४ महिन्यांत त्यांची जीवनसंगिनी शोधली आहे.
तीन भारतीय खेळाडू ज्यांनी लॉकडाऊनमध्ये शोधली त्यांची जीवनसाथी (3 Indian Cricketers Who Found Their Life Partner in Lockdown) –
१. श्रीकर भरत –
आंध्र प्रदेशचा यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरतचे नुकतेच लग्न झाले आहे. १० वर्षे आपली प्रेयसी अंजलीला डेट केल्यानंतर अखेर ७ ऑगस्टला त्याने तिच्याशी लग्न केले. कोरोना व्हायरसमुळे त्याला धूमधडाक्यात लग्न करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने साधारण पद्धतीने लग्न केले आहे.
भरतने आपली पत्नी अंजलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना ही आंनदवार्ता दिली. २६ वर्षीय युवा खेळाडू भरत हा प्रतिभाशाली यष्टीरक्षक फलंदाज आहे. गतवर्षी बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात भरत भारतीय संघाचा भाग होता. तो भविष्यात भारतीय संघातील प्रमुख खेळाडूच्या रुपात खेळताना दिसू शकतो.
भरतने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७८ सामने खेळत ४२८३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ९ शतकांचा आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे.
२. हार्दिक पंड्या –
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने मे महिन्याच्या शेवटी सोशल मीडियावर आपल्या पोस्टने खळबळ उडवली होती. हार्दिकने त्याची प्रेयसी नताशा स्टेनकोव्हिकसोबत यावर्षीच्या सुरुवातीला साखरपुडा केला होता. पण, त्यांच्या लग्नाची कसलीही माहिती त्याने चाहत्यांना दिली नव्हती.
त्यानंतर मे महिन्यात त्याने बेबी बंपसोबत नताशाचा फोटो सोशल मीडियावर केला. त्यामुळे सर्वजण चकित झाले होते. शेवटी ३० जुलैला नताशाने एका मुलाला जन्म दिला. कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हार्दिक वडील बनला आहे. त्याने अजूनही त्याच्या मुलाचे नाव ऑफिशियली सांगितलेले नाही. पण, माध्यमातील वृत्तांनुसार तो आपल्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवू शकतो.
३. युजवेंद्र चहल –
भारतीय संघाचा नटखट खेळाडू युजवेंद्र चहलने लॉकडाऊनमध्ये त्याची जीवनसंगिनी शोधली आहे. नुकतेच चहलने आपली होणारी पत्नी धनश्री वर्मासोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर करत सर्वांना साखरपुड्याची गोड बातमी दिली. चहल लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह होता. तरीही त्याने कुणालाही या गोष्टीची भनकही लागू दिली नाही.
चहलची होणारी पत्नी धनश्री हीदेखील सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती यूट्यूबर, डॉक्टर आणि डान्स कोरियोग्राफर आहे. तिची स्वतची डान्स कंपनीदेखील आहे.
ट्रेंडिंग लेख –
आपल्या ‘पहिल्या प्रेमा’मुळे एमएस धोनीने घेतली भारताच्या स्वातंत्र्यदिनी निवृत्ती
ज्या शहरात पोरं आयआयटी, जीईई, यूपीएससीचा अभ्यास करायची, तिथलं जगच धोनीने बदललं