---Advertisement---

धोनीचा पहिला कर्णधार सौरव गांगुलीने केली भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘प्रत्येक चांगली गोष्ट…’

---Advertisement---

गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेला भारतीय क्रिकेटमधील एमएस धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२० रोजी थांबला. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या संध्याकाळी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.

एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केले अलविदा-

भारतीय क्रिकेट संघाला कर्णधार म्हणून जबरदस्त यश मिळवून देणाऱ्या एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल गेल्या वर्षी विश्वचषकानंतर बरीच चर्चा सुरू होती. तसेच धोनी पुन्हा पुनरागमन करेला अशी देखील चर्चा होती. पण ३९ वर्षीय एमएस धोनीने स्वातंत्र्यदिनी आपली निवृत्ती घोषित करत सर्व तर्क-वितर्क संपवले.

कर्णधार म्हणून माहीने मोठे यश संपादन केले

एमएस धोनी एक कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटसाठी यशस्वी ठरला. वनडे क्रिकेटमध्ये त्याने फलंदाज म्हणून १०,००० हून अधिक धावा केल्या आणि यष्टीरक्षक म्हणूनही त्याने भरपूर यश मिळवले.

कर्णधारपदी असताना धोनीने भारताला २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक, तसेच २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार होता. तर त्याच्या नेतृत्वात भारताने कसोटीमध्ये पहिल्यांदा अव्वल स्थानही मिळवले होते.

सौरव गांगुलीने एमएस धोनीबद्दल केले भावनिक पोस्ट – 

धोनीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआय अध्यक्ष व माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीनी इंस्टाग्राम पोस्ट करत लिहीले, ‘हा एका युगाचा शेवट आहे. तो भारत आणि जगासाठी एक शानदार खेळाडू होता. त्याच्या कर्णधारपदाची क्षमता आणि निर्णय घेण्याची पद्धत फारच वेगळी होती. खासकरून क्रिकेटच्या छोट्या स्वरूपात. त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या वनडे सामन्यातील फलंदाजीने प्रत्येकाला रोमांचित केले. खरं तर ज्याची बरोबरी करणे मुश्किल आहे.”

“प्रत्येक चांगली गोष्ट संपुष्टात येतेच. त्याची परिपूर्ण चमकदार कामगिरी होती. त्याच्यासारखे कठोर नेतृत्व शोधणे कठीण आहे. त्याची एक उत्तम कारकीर्द आहे. मी त्याला शुभेच्छा देतो.”

https://www.instagram.com/p/CD6pnFSAAcY/

सौरव गांगुली हा धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गांगुली हा धोनीचा पहिला कर्णधार ठरला.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५३८ सामने खेळताना १०८ अर्धशतके आणि १६ शतकांसह १७२६६ धावा केल्या आहेत.

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---