---Advertisement---

‘त्यावेळी मी कारगिल युद्ध लढायला निघालेलो’, शोएब अख्तरने केले बेताल विधान

shoaib-akhtar
---Advertisement---

भारत आज (२६ जुलै) कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. २३ वर्षांपूर्वी कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. कारगिल युद्ध ६० दिवसांपेक्षा जास्त चालले. या युद्धाला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले होते. पाकिस्तानशी लढताना या युद्धात ५२७ भारतीय जवान शहीद झाले होते. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानया दोन्ही बाजूंच्या अनेक खेळाडूंनी अनेकदा या युद्धावर जोरदार भाषणबाजी केली आहे. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचाही समावेश आहे. शोएबने २ वर्षांपूर्वी एका पाकिस्तानी न्यूज चॅनलवर म्हटले होते की, ‘मी दोनदा कारगिलमध्ये भारताविरुद्ध युद्ध लढायला गेलो होतो, पण त्याला संधी देण्यात आली नाही’.

शोएब अख्तर म्हणाला होता की, ‘माझ्या देशभक्तीवर कोणीही शंका घेऊ नये. फार कमी लोकांना माहीत आहे की, त्या दिवसांत माझा नॉटिंगहॅम काउंटी क्लबशी दोन दशलक्ष पौंडांचा एक करार झाला होता. पण जेव्हा कारगिल युद्ध सुरु झाले तेव्हा मी ते सर्व सोडून आलो होतो’.

तसेच, ‘लाहोरमध्ये येऊन उभा राहिलो होतो. हाजी जनरल माझ्याकडे आले आणि म्हणाले तू इथे काय करतो आहेस. मी म्हणालो लढाई सुरू होणार आहे, मरायचे असेल तर सोबतच मरु, बघून घेऊ सर्वांना”. मी काउंटी सीझन सोडून परत आलो होतो आणि दोनदा लढायला गेलो होतो’, असेही शोएब अख्तर म्हणाला.

दरम्यान, शोएब अख्तर हा प्रत्येकवेळील आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. यावेळी मात्र, त्यानी क्रिकेट वगळता थेट राष्ट्रभक्तीच्या विषयाला हात घातल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. यामुळे अनेकांनी शोएब अख्तरला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

श्रेयस अय्यरबद्दल ‘ती’ कमेंट करणे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूच्या अंगाशी, सारखा वाजतोय फोन!

तेव्हा संपादकानेच घातलेला घोळ; असे बदललेले द्रविडचे नाव

श्रेयस अय्यरला घ्यायचीये विराटची जागा! स्वत:च व्यक्त केली इच्छा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---