पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं नुकतंच एक धक्कादायक विधान केलं. अख्तरला त्याच्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचं आहे. अख्तर म्हणाला की, त्याला आपल्या देशातील पहिला अब्जाधीश व्हायचं आहे. हे बोलताना अख्तर म्हणाला की, तो देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी खूप गंभीर आहे.
एका पॉडकास्टवर बोलत असताना अख्तरनं त्याच्या या इच्छेबद्दल सांगितलं. सध्या अख्तर हा क्रिकेट समालोचक आणि प्रस्तुतकर्ता म्हणून काम करतोय. तो वेगवेगळ्या क्रिकेट मालिकांमध्ये दिसतो. 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा अख्तर प्रामुख्यानं याद्वारेच कमाई करत आहे. सध्या तो पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
पॉडकास्टवर अख्तर म्हणाला, “मी पाकिस्तानातून येणारा पहिला अमेरिकन डॉलर अब्जाधीश बनेन. एक दिवस मला पाकिस्तानपेक्षा श्रीमंत व्हायचं आहे. मी गंमत करत नाही. मी याबाबत गंभीर आहे.”
शोएब अख्तर हा पाकिस्तानच्या अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल खेळलं आहे. अख्तर 2007-08 च्या पहिल्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. अख्तरनं आयपीएलमध्ये तीन सामने खेळले, ज्यात त्यानं 5 विकेट घेतल्या.
शोएब अख्तरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शोएब अख्तर 1997 ते 2011 दरम्यान पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. अख्तरनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाकिस्तानसाठी 46 कसोटी, 163 एकदिवसीय आणि 15 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीत त्यानं 25.69 च्या सरासरीनं 178 विकेट घेतल्या. याशिवाय त्यानं एकदिवसीय सामन्यांच्या 162 डावांमध्ये 24.97 च्या सरासरीनं 247 विकेट घेतल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 15 डावांमध्ये या माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजानं 22.73 च्या सरासरीनं 19 विकेट घेतल्या.
हेही वाचा –
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार? दिग्गज खेळाडूचा मोठा दावा
आर अश्विनच्या निवृत्तीवर काय म्हणाला पॅट कमिन्स? कांगारु कर्णधाराचं वक्तव्य चर्चेत
अश्विननं कसोटीत धोनीपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत? आकडेवारी जाणून बसेल धक्का!