पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) अनेक दिग्गज फलंदाजांना त्याच्या धारदार गोलंदाजीनं चितपट केलं होतं. परंतू आश्चर्याची गोष्ट ही आहे की, अख्तर म्हणाला भारताच्या एका फलंदाजला बाद करण्यासाठी त्याचा घाम फुटायचा. पण तो फलंदाज भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नसून कोणी दुसराच आहे.
शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) राहुल द्रविडला (Rahul Dravid) सचिन तेंडुलकरपेक्षा धोकादायक फलंदाज मानलं आहे. तेंडुलकरपेक्षा द्रविडला बाद करणं माझ्यासाठी जास्त कठीण होतं, असं अख्तरनं एकदा म्हटलं होतं. अख्तरच्या म्हणण्यानुसार, द्रविड त्याच्या क्षमतेमुळे अख्तरचा चेंडू सहज खेळायचा.
अख्तर म्हणाला, “जर एखादा फलंदाज द्रविडसारखा उशीरा खेळत असेल, तर आम्ही त्याला विकेटपासून लांब चेंडू टाकायचो आणि बॅट, पॅडमधील अंतर शोधून काढायचो. आम्ही चेंडू पॅडवर मारण्याचा प्रयत्न करायचो.” अख्तरनं पुढे सांगितलं की, बंगळुरुमधील एका सामन्यात द्रविडला एलबीडब्ल्यू बाद करण्यात तो यशस्वी झाला होता, पण अंपायरनं त्याला बाद घोषित केलं नाही.
बंगळुरुच्या सामन्याची आठवण करुन देत शोएब अख्तर म्हणाला (Shoaib Akhtar) की, “एकदा बेंगळुरुमध्ये फायनल सामना होता तेव्हा मी सदागोपन रमेशला लवकर बाद केलं होतं. आम्ही 3-4 विकेट लवकर घेतल्या. त्या सामन्यात सचिन खेळत नव्हता. शाहिद आफ्रिदीनं (Shahid Afridi) मला चेंडू दिला आणि म्हणाला की, काहीही कर पण द्रविडला बाद कर नाहीतर तो मोठी खेळी खेळेल. त्यानंतर मी द्रविडच्या पॅडवर चेंडू मारला आणि अंपायरकडे अपिल केली. परंतू त्यांनी आमच्या बाजूनं निर्णय दिला नाही, पण शेवटी तो सामना आम्हीच जिंकला.”
शोएब अख्तरनं त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीमध्ये 163 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 247 बळी घेतले. यादरम्यान त्याची गोलंदाजी सरासरी 24.97 राहिली तर इकाॅनाॅमी रेट 4.76 राहिला. एकदिवसीय सामन्यात अख्तरनं उत्कृष्ट गोलंदाजी करत 16 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर 36 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात त्यानं 178 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. यादरम्यानं त्यानं 2 वेळा एका सामन्यात 10 विकेट्सही घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितचं नाव होणार अजरामर, शतकांच्या विक्रमापासून केवळ दोन पावलं दूर ‘हिटमॅन’!“हार्दिकवर अन्याय झाला” माजी भारतीय खेळाडूने टी20 कर्णधारपदावर दिली प्रतिक्रिया
पाकिस्तानला बसणार 440 वोल्टचा झटका, चॅम्पियन्स ट्राॅफीचं यजमानपद धोक्यात?