पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज शोएब अख्तर नेहमीच त्यात्या विधानांमुळे चर्चेत असतो. अनेकदा अख्तरच्या वक्तव्यांमुळे वाद देखील पेटले आहेत. भारतीय क्रिकेटविषयी देखील तो नेहमीच मत व्यक्त करत आला आहे. अशात आता त्याच्या एका नवीन विधानाची चर्चा सोशल मीडियासह सर्वत्र रंगली आहे. अख्तर म्हटल्याप्रमाणे त्याचे आधार कार्ड बनले आहे. या विधानानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अख्तरवर काही प्रमाणात टीका होतानाही दिसते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना शोएब अख्तर (Shoaib Akhtar) नेहमीच भारतीय फलंदाजांची सर्वात मोठी बाधा ठरायचा. लाईव्ह सामन्यादरम्यान त्याने अनेकदा भारतासह जगभरातील दिग्गजांसोबत वाद घातले. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मात्र शोएबची एक पूर्णपणे दुसरी बाजू चाहत्यांसमोर आली. भारताविषयी त्याने यापूर्वी अनेकदा कौतुक केले आहे. लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना देखील अख्तरने भारताचे कौतुक केले. पण याच वेळी त्याचे आधार कार्डविषयीचे विधान चर्चेत आले.
कतरची राजधानी दोहामध्ये मागच्या काही दिवसांपासून लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा खेळली जात आहे. या लीगमध्ये एकूण तीन संघ खेळत आहेत. इंडिया महाराज, आशिया लायन्स आणि वर्ड जायंट्स अशी या तीन संघांची नावे आहेत. मंगळवारी (14 मार्च) इंडिया महाराज आणि आशिया लायन्स यांच्यात आमना सामना झाला. इंडिया महाराजने हा सामना 10 विकेट्स राखून नावावर केला. शोएब अख्तर या सामन्यात आशिया संघासाठी खेळताना फक्त एक षटक टाकू शकला. 47 वर्षीय अख्तरवर हे षटक टाकल्यानंतर थेट मैदानाबाहेर जाऊन बसल्याचे पाहायला मिळाले.
उभय संघांतील हा सामना संपल्यानंतर अख्तरला भारतीय संघाविषयी काही प्रश्न विचारले गेले. यावेळी तो इतरही काही मुद्यांवर व्यक्त झाला. अख्तर म्हणाला, “भारत खूपच छान जागा आहे. मलाही भारत आवडतो. मी दिल्लीला नेहमीच येत-जात असतो. माझे तर आधार कार्ड देखील बनले आहे. आता काहीच राहिले नाहीये.” दरम्यान शोएब अख्तरने जरी हे विधान मजेत केले असले, तरी नेटकऱ्यांनी मात्र त्याला ट्रोल केल्याचे दिसते. यावर्षी आशिया चषक खेळला जणार असून अख्तरला भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना पाहण्याची इच्छा आहे. त्याने ही इच्छा बोलूनही दाखवली.
(Shoaib Akhtar’s Statement on Aadhaar Card)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs AUS 1st ODI । दिग्गजाने निवडली संभावित प्लेइंग इलेव्हन, प्रमुख खेळाडू संघातून बाहेर
केएल राहुल की केएस भरत, कुणाला मिळणार डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याची संधी?