पाकिस्तानचा माजी वेगवान शोएब अख्तर हा आपल्या मजेदार आणि बोलक्या स्वभावासाठी ओळखला जातो. तो नेहमी वेगवेगळ्या मुलाखतीत नवनवे खुलासे करत असतो. नुकत्याच एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शोएबने २००७ भारत दौऱ्यावेळीचा एक किस्सा सांगितला आहे. भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्याबाबत असलेली ही घटना समजल्यानंतर भारतीयांनी मला मारले असते, असे शोएबने म्हटले.
… तर मला भारतीयांनी मारले असते
एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शोएबने २००७ भारत दौऱ्यावरील एका घटनेचा उलगडा केला. तो म्हणाला, “पाकिस्ताननंतर मला सर्वात जास्त प्रेम मिळाले ते ठिकाण म्हणजे भारत. भारत भेटीबद्दल माझ्या अनेक चांगल्या आठवणी आहेत. २००७ च्या दौऱ्यावर मी एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होतो. कार्यक्रमानंतर, एक छोटेसे गेट-टुगेदर आयोजित करण्यात आले होते. नेहमीप्रमाणे मला काहीतरी वेगळे करायचे होते.”
“मी फक्त मनोरंजनासाठी सचिन तेंडुलकरला उचलण्याचा प्रयत्न केला. मी त्याला उचलले.पण, त्यानंतर तो माझ्या हातातून निसटला. सचिन खाली पडला. तो जास्त जोरात पडला नव्हता. मात्र, यानंतर मी प्रचंड घाबरलेलो. मला वाटले की, जर सचिनला दुखापत झाली तर भारत मला कधीही व्हिसा देणार नाही. भारताची जनता मला इथे येऊ देणार नाही किंवा मला मारतील.”
शोएब पुढे म्हणाला, “मी पटकन त्याला उचलले व त्याची विचारपूस केली. तो व्यवस्थित असल्याचे त्याने मला सांगितले. आम्ही मैदानावर जी क्रिने लढत असतो तरी मैदानाबाहेर चांगले मित्र आहोत.”
शोएब अख्तर हा सचिनसह वीरेंद्र सेहवाग व हरभजन सिंग यांचा अत्यंत जवळचा मित्र मानला जातो.
ऐतिहासिक ठरला होता २००७ दौरा
पाकिस्तान क्रिकेट संघाने २००७ मध्ये केलेला भारत दौरा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला होता. कारण, यानंतर दोन्ही देशातील दिग्गज खेळाडू कधीही द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने आले नाहीत. भारताने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० तर, वनडे मालिकेत ३-२ अशी सरशी साधलेली.
महत्त्वाच्या बातम्या –
ताबडतोड फलंदाजी! अवघ्या २० चेंडूत ‘या’ फलंदाजाने फटकावल्या १०२ धावा, पाहा व्हिडिओ
लॉर्ड्स कसोटीला मुकणार अँडरसन? १४ वर्षानंतर घडणार ‘अशी’ घटना
टी२० क्रमवारीत मुस्तफिजुरची ऐतिहासिक मजल, तर शाकिब पुन्हा पोहोचला पहिल्या स्थानी