---Advertisement---

तिसरी पत्नी सना जावेदसोबत स्वित्झर्लंडला पोहोचला शोएब मलिक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

On: शुक्रवार, ऑगस्ट 23, 2024 1:06 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा स्टार फलंदाज शोएब मलिकनं जानेवारी 2024 मध्ये तिसरं लग्न केलं. भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झासोबत घटस्फोट घेतल्यानंतर शोएबनं अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं. यामुळे त्याच्यावर जोरदार टीका देखील झाली होती. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोएब मलिकला चांगलंच फैलावर घेतलं होतं.

आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोएब मलिकनं नुकतेच पत्नी सना जावेदसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो स्वित्झर्लंडमधील आहेत. या पोस्टला कॅप्शन देत मलिकनं लिहिले, “एकत्र”. याच्या पुढे त्यानं हार्टचा इमोजीही लावल आहे. शोएब मलिकनं हा फोटो अपलोड करताच भारतीय चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

एका युजरनं त्याची खिल्ली उडवत लिहिलं की, “नवीन व्यक्ती येईपर्यंत एकत्र.” आणखी एका युजरनं लिहिलं, “किती वेळ एकत्र?” दुसऱ्या युजरनं लिहिलं, “यार, एवढी टीका होत असूनही फोटो पोस्ट करण्याची हिम्मत कशी होते?” आणखी एका युजरनं लिहिले की, “हा माणूस फक्त दोन देशांचा अपमान करण्यासाठी सनासोबतचा फोटो अपलोड करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

 

शोएब मलिकनं आतापर्यंत तिन लग्न केले आहेत. त्यानं पहिलं लग्न आयेशा सिद्दीकी नावाच्या पाकिस्तानी महिलेशी केलं होतं. दोघे 2002 मध्ये विवाहबद्ध झाले होते. तिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर शोएबनं 2010 मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी लग्न केलं. हे त्याचं दुसरं लग्न होतं. हे लग्न 14 वर्ष चाललं. यानंतर जानेवारी 2024 मध्ये शोएब मलिकनं सानिया मिर्झासोबत घटस्फोट घेतला आणि पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं.

हेही वाचा – 

नीरज चोप्राची मोठी झेप, ब्रॅन्ड व्हॅल्यूच्या बाबतीत हार्दिक पांड्याला मागे टाकलं; आता नंबर रोहितचा!
सर्वोत्तम कामगिरी करूनही नीरज चोप्रा निराश! म्हणाला, ‘मी माझ्या थ्रोमुळे…’
नीरज चोप्राने अवघ्या 14 दिवसांतच मोडला ऑलिम्पिक विक्रम, केला हंगामातील सर्वोत्तम थ्रो!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---