---Advertisement---

सानिया मिर्झानंतर शोएब मलिकही घेतोय निवृत्ती? मैदानात मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’

Shoaib-Malik
---Advertisement---

पाकिस्तानचा दिग्गज शोएब मलिक याच्या नावावर नवीन विक्रम रचत गेला आहे. त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये 500 सामने खेळले आहेत आणि अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच खेळाडू बनला. जागतिक पातळीवर विचार केला, तर 500 टी-20 सामने खेळणारा शोएब मलिक तिसरा क्रिकेटपटू आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये शुक्रवारी (3 फेब्रुवारी) शोएब मलिकने हा विक्रम नावावर केला.

शोएब मलिक (Shoaib Malik) पाकिस्तान क्रिकेट संघात खेळणारा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. वयाच्या 41 व्या वर्षी देखील तो नवनवीन विक्रम नावावर करत आहे. शुक्रवारी (3 फेब्रुवारी) बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ढाका डोमिनेटर्स आणि रंगपूर रायडर्स यांच्यातील सामना पार पडला. हा सामना सुरू होण्याआदी रंगपूर रायडर्स संघाच्या खेळाडूंकडून शोएब मलिक याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ मिळाला. शोएस मलिक या सामन्यात अवघ्या 7 धावांवर बाद झाला, पण त्याचा संघ रंगपूर रायडर्सने हा सामना 2 विकेट्स राखून जिंकला. शोएस मलिकने त्याच्या टी-20 कारकिर्दीत 500 सामन्यांमध्ये 127 च्या स्ट्राईक रेटने 12287 धावा केल्या आहेत.

सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याच्या बाबततीत शोएबच्या पुढे असेलेले दोन्ही खेळाडू वेस्ट इंडीज संघाचे आहेत. यादीत पहिल्या क्रमांकावर 614 टी-20 सामने खेळणारा कायरन पोलार्ड आहे तर दुसऱ्या क्रमांकावर 556 सामन्यांसह ड्वेन ब्रावो आहे. शोएब मलिक 500 टी-20 सामन्यांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 41 वर्षीय शोएब मलिकला काही दिवसांपूर्वी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी प्रश्न विचारला गेला होता. यावेळी त्याने उत्तर दिले होते की, “मी अजून क्रिकेट खेळत आहे. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असले तरी, माझी फिटनेस 25 वर्षीय खेळाडूसारखी आहे. त्यामुळे निवृत्तीचा विचार न करता मी क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे.”

सानिया मिर्झाने खेळली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा –
दरम्यान, शोएबची पत्नी दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झा हिने नुकतीच शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळली. जानेवारी महिन्यात खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि रोहन बोपन्ना () यांची जोडी मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पोहोचला. अंतिम सामन्यात मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. उपविजेतेपद पटकावणारी सानिया मिर्झा जेव्हा बोलण्यासाठी पुढे आली, तेव्हा भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाला. (Shoaib Malik received guard of honor during BPL match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

सिराज आणि उमरानकडून मोठी चूक! नेटकऱ्यांकडून हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप
कसोटी क्रिकेट लवकरच होणार मोठा बदल, लाल चेंडूने खेळताना येत आहेत अडचणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---