सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतल्यानंतर शोएब मलिक याचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. शोएब मलिकवर बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप आहे. त्यानंतर बांगलादेश प्रीमियर लीगमधील शोएब मलिकचा करार रद्द करण्यात आला आहे.
बांगलादेश प्रीमियर लीगच्या सामन्यात शोएब मलिक (Shoaib Malik) याने 1 षटकात 3 नो बॉल टाकले, त्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार मॅच फिक्सिंगच्या शंकेत अडकला. फ्री प्रेस जर्नलच्या बातमीनुसार, बांगलादेश प्रीमियर लीग संघ फॉर्च्यून बरिसालने शोएब मलिकचा करार तात्काळ रद्द केला आहे.
3 no-balls and 18 runs in one over. Not the best outing this week for Shoaib Malik.
.
.#BPL2024 #BPLonFanCode #ShoaibMalik pic.twitter.com/PNmHeOqgJq— FanCode (@FanCode) January 23, 2024
अलीकडेच बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्युन बरिसाल आणि खुलना टायगर्स हे संघ आमनेसामने आले होते. फॉर्च्युन बरिसालकडून खेळत असलेल्या शोएब मलिकने 1 ओव्हरमध्ये 3 नो बॉल टाकले. खरं तर, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पिनरने 1 ओव्हरमध्ये 3 नो बॉल टाकले. यानंतर शोएब मलिकवर मॅच फिक्सिंगचे आरोप होऊ लागले. दरम्यान, बांगलादेश प्रीमियर लीग संघ फॉर्च्यून बरिसालचे मालक मिझानुर रहमान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
याआधी शोएब मलिक बांगलादेश प्रीमियर लीगच्या आगामी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे वृत्त होते. तो दुबईला रवाना होणार आहे, त्यामुळे उर्वरित सामने खेळता येणार नसल्याचेही सांगण्यात आले. त्यावेळी शोएब मलिक वैयक्तिक कारणासाठी दुबईला जात असल्याचे सांगण्यात आले होते.
नुकतेच शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. त्याचवेळी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे लग्न झाले आहे होते. याच कारणांमुळे सोशल मीडियावर शोएब मलिकचा बोलबाला राहिला. मात्र आता बांगलादेश प्रीमियर लीगमधील मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हेही वाचा
क्रिकेटनंतर आता युवराज सिंग व्यावसायिक खेळाडूंकडून विशेष प्रशिक्षण घेऊन ‘या’ खेळात नशीब आजमवणार
नुसती यादी पाहून डोळे फिरतील! आयसीसीचे 10 ॲवॉर्ड्स मिळवणारा विराट जगात एकमेव