भारतीय क्रिकेटमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी खळबळजनक दावा करत भारतीय खेळाडूंवर आरोप लावले आहेत. त्यांनी आरोप लावले आहेत की, भारतीय खेळाडू स्वत:ला फिट करण्यासाठी इंजेक्शनचा वापर करतात. नुकतेच, पुन्हा एकदा मुख्य निवडकर्ता म्हणून निवडल्या गेलेल्या चेतन शर्मा यांनी एका खासगी चॅनेलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कथितरीत्या हा खुलासा केला आहे.
या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि इतर खेळाडूंच्या संघाबाहेर होण्याच्या कथित भीतीबाबतही चर्चा केली आहे. (shocking bcci chief selector chetan sharma sting operation allegation on indian team players fitness read here)
मागील एक-दोन वर्षांमध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा फिटनेस हा सर्वात चिंतेचा विषय बनला आहे. विशेषत: मागील वर्षी भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंपासून ते नवीन खेळाडूंपर्यंत अनेक दुखापतग्रस्त होत राहिले. त्याचमुळे त्यांना सामन्यांना मुकावे लागले. काही खेळाडू तर संघात पुनरागमन करूनही दुखापतग्रस्त होत राहिले होते. अशात हा प्रश्न उपस्थित होतो की, खेळाडूंच्या फिटनेसचा स्तर इतका खराब का आहे? अशात चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी एका खासगी चॅनेलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा कथित खुलासा केला आहे. या खुलाश्यामध्ये त्यांनी अनेक आरोप लावले आहेत.
यानंतर सोशल मीडियावर नेटकरी संतापले आहेत. ते ट्वीट करत चेतन शर्मा यांना बरखास्त करण्याची मागणीदेखील करत आहेत.
https://twitter.com/MRxTweetz_/status/1625524183244627969
https://twitter.com/GoluTheroy/status/1625523767144493056
This Chetan Sharma Sting Operation is going to make things unusual for BCCI and ICT in the coming days. #Zee #ChetanSharma
— Mihir Gadwalkar (@mihir_gadwalkar) February 14, 2023
https://twitter.com/MrOm14852020/status/1625520913193267202
चेतन शर्मांचे आरोप
-अनफिट खेळाडू स्वत:ला पूर्ण फिट दाखवण्यासाठी बनावट इंजेक्शन घेतात.
-पेन किलर इंजेक्शन घेत नाहीत कारण, त्यासाठी त्यांना डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घ्यावी लागेल. तसेच, ते डोपिंगमध्ये पकडले जाऊ शकतात.
-ते डॉक्टरांना बोलावून असे इंजेक्शन घेतात, ज्यामुळे डोप चाचणीत ते पकडले जाऊ शकत नाहीत.
-जसप्रीत बुमराहला खूप मोठी दुखापत झाली आहे. त्याने एक सामना जरी खेळला असता, तर वर्षभरासाठी बाहेर झाला असता.
-प्रत्येक खेळाडूला संघाबाहेर जाण्याची भीती आहे. त्यामुळे ते इंजेक्शन घेऊन स्वत:ला फिट करतात.
-कोणत्याही खेळाडूला संघात आल्यानंतर त्याची जागा सोडायची नसते. त्यासाठी अनेकदा पूर्ण फिटनेस नसूनही इंजेक्शनमार्फत स्वत:ला फिट ठेवतात.
-संजू सॅमसनविषयी निवडकर्ते दबावात आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हॅलेंटाईनच्या दिवशी शुबमनने शेअर केला साराने हजेरी लावलेल्या कॅफेतील फोटो, नक्की भानगड काय?
मोठी बातमी! महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, एका क्लिकवर घ्या जाणून