इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (दि. 26 मे) गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी तिकीट घेण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमबाहेर जोरदार गोंधळ उडाला असून चेंगराचेंगरी झाली. बीसीसीआयने ऑनलाईन तिकीट विक्रीसाठी पेटीएमशी करार केला आहे. मात्र, तिकीटे बूक करूनही प्रेक्षकांना तिकीटाची प्रत स्वत:सोबत बाळगावे लागतात. अशात आता यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका चाहत्याने संतापही व्यक्त केला आहे.
नियमानुसार, तिकीटे ऑनलाईन बूक केल्यानंतरही प्रेक्षकांना स्टेडिअममधून तिकीटाची प्रत घ्यावी लागते. मात्र, तिकीटे खरेदी करण्यासाठी स्टेडिअमच्या बाहेर प्रेक्षकांची लांबच्या लांब गर्दी पाहायला मिळाली. यादरम्यान तिकीट घरापर्यंत पोहोचताना त्यांच्यात चेंगराचेंगरीही झाल्याचेही व्हिडिओत दिसत आहे.
View this post on Instagram
खराब व्यवस्थापनावर चाहत्याचा संताप
भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे भागधारक असलेल्या चाहत्याने संताप व्यक्त केला. त्याने म्हटले की, त्यांना तिकिटांच्या प्रत्यक्ष प्रती जवळ बाळगणे आवश्यक आहे, हे समजताच फसवणूक झाल्याचे वाटले. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका चाहत्याने म्हटले की, त्याने तिकीट बुकिंग वेबसाईटवर सुविधा शुल्कही भरले आहे. तरीही तो स्टेडिअमबाहेरील लांबच्या लांब रांगेत उभा होता. प्रत्यक्ष प्रत जवळ असल्याशिवाय त्याला सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये परवानगी दिली जाणार नाही.
Look at the scenarios personal experience of ticket buying problems created by paytm final tickets after buying tickets and taking payment these are the problems we are facing @IPL @JayShah @GCAMotera . pic.twitter.com/H8G3LvxcWi
— Rahul Modi (@rahulm0902) May 25, 2023
यावेळी चाहते तिकीट बुकिंग प्रक्रियेवर नाराज असल्याचे दिसले. एका चाहत्याने आरोप केला की, तिकीटे विक्रीसाठी काढताच, ती गहाळ झाली.
Hey @paytminsider in the ipl final booking ticket page it is showing coming soon, will the ticket window again open? pic.twitter.com/1Xmj7Ypsl7
— Himanshu jain (@himanshu_jain7) May 25, 2023
चेन्नई सुपर किंग्सला दुसऱ्या क्वालिफायरमधील विजेत्या संघाची प्रतीक्षा
चेन्नई सुपर किंग्स संघाने पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभूत केले. तसेच, अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स संघानेही लखनऊ सुपर जायंट्स संघाचा पराभव करत दुसऱ्या क्वालिफायरचे तिकीट मिळवले होते. आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात विरुद्ध मुंबई संघापैकी जो संघ जिंकेल, त्याला अहमदाबाद येथे चेन्नईविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे अंतिम सामना खेळावा लागणार आहे. (shocking Chaos At Narendra Modi Stadium Amid Rush To Collect Print Tickets IPL 2023 Qualifier 2)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलची बक्षीस रक्कम पाहून तुम्हीच हसाल, IPLसमोर ‘अतिसामान्य’, पाहा रक्कम
Video : चाहत्यांनी ‘कोहली-कोहली’ म्हणताच नवीनची रिऍक्शन व्हायरल; पराभवानंतर म्हणाला, ‘मला तर खूपच…’